नांदूर-मध्यमेश्वर धरणावर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तरुणाचे प्रताप समोर आले. मात्र हा तरुण कोण आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. या धरणातून जायकवाडीसाठी एक ते सव्वा लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत असताना तरुणाचे पराक्रम सुरु होते. यावेळी तिथे सुरक्षारक्षक नव्हता.
त्यामुळे तरुण दरवाजापर्यंत पोहोचला. तरुण शिडीवर चढला आणि करामतीचा व्हिडीओ बनवला. त्यानंतर ही माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली. जीवावर बेतणारी अशी स्टंटबाजी काळजाचा थरकाप उडवणारी आहे.