Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाराज मुंडेंच्या समर्थकांनी जाळला मुख्मंत्रंचा पुतळा

नाराज मुंडेंच्या समर्थकांनी जाळला मुख्मंत्रंचा पुतळा
मुंबई- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बहुचर्चित विस्तारानंतर या नव्या मंर्त्यांचे खातेवाटप जाहीर केले आहे. यात पंकजा मुंडे यांच्यासह अनेक मंर्त्यांचे पंख छाटण्यात आले आहे. खातेवाटपात पंकजा मुंडे यांना मोठा झटका बसला आहे. तो म्हणजे, त्यांच्याकडून जलसंधारण खाते काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज झाल्या आहे. त्यांनी आपली नाराजी ’टि्वटर’वर व्यक्त केली आहे.
 
अहमदनगरमधील पाथर्डी येथे पंकजा मुंडे यांच्या संतप्त कार्यकत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळला. पंकजा यांचे जलसंधारण मंत्रालय काढल्याने कार्यकर्ते चिडले आहेत. त्यांनी यावेळी मुख्यमंर्त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजीही केली.
 
पंकजा मुंडेंनी केले ट्वीट, मी जलसंधारण खात्याची मंत्री नाही..’पंकजा मुंडे सध्या सिंगापूरला आहेत. वर्ल्ड वॉटर लीडर समिटला उपस्थित राहाण्यासाठी पंकजा गेल्या आहे. पण, त्यांचे जलसंधारण खाते काढून घेतल्याने त्या प्रचंड नाराज झाल्या आहेत. त्यामुळे आपण मंत्री नसल्याने या समिटला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांने 'ट्वीट' केले आहे. विशेष म्हणजे पंकजा यांच्या 'ट्‍वीट'वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिट्‍वीट केले आहे. 'खात्याची मंत्री म्हणून नाही तर सरकारची प्रतिनिधी म्हणून या समिटला उपस्थित राहा', असे मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री व पंकजा यांच्या 'ट्‍वीट-रिट्‍वीट'मुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मध्य प्रदेशात पुरात 15 जण मृत्युमुखी