निजामाचा बाप म्हणणाऱ्यांसोबत युती ठेऊ नये असे मत भाजप प्रदेश कार्यकारणीत अनेकांनी मांडले. विनोद तावडे यांनी शिवसेनेला 50 वर्षे पुर्ण झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यानंतर आगामी महापालिका-जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेशी युती ठेवायची की नाही, यावर चर्चा सुरू झाली. यावेळी प्रदेश कार्यकारणीच्या सदस्यांनी आपली परखड मते मांडली.
निजामाचा बाप म्हणणाऱ्यांसोबत युती ठेऊ नका, असे मत मधु चव्हाण यांनी मांडले. त्याला कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला.