Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पतंग काढणे बेतले जीवावर मुलाचा दुर्दैवी मृत्यू

पतंग काढणे बेतले जीवावर मुलाचा दुर्दैवी मृत्यू
मनमाड , बुधवार, 14 सप्टेंबर 2016 (17:06 IST)
शहरात पतंग काढताना पोटात रॉड घुसल्याने एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रोफेसर कॉलनीतील मोकळ्या जागेत पतंग पकडायला गेला असताना 13 वर्षांच्या आदित्य जाधवच्या पोटात लाकडी गेटचा धारदार रॉड घुसला आहे.
 
पांडूरंग नगर येथे आदित्य राहत होता. खेळण्यासाठी तो आपल्या बहिणीसोबत मावशीच्या घरी आला. दुपारी कटलेली पतंग घेण्यासाठी तो प्रोफेसर कॉलनी जवळच्या कंपाऊन्डमध्ये लोखंडी गेट उतरुन खाली उतरला होता.त्यावेळी त्याने पतंग पकडलीही आणि ती  पतंग घेऊन पुन्हा गेटवरुन खाली उतरत होता.त्याच वेळी  हात सटकल्याने गेटला लावलेला धारदार अणुकीदार रॉड पोटात गुसला आणि  तो गंभीर  जखमी झाला होता. परिसरातील नागरिक त्याला दवाखान्यात नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. आदित्य जाधव हा नगरसुल मधल्या संत नारायणगिरी महाराज आश्रमात सहाव्या इयत्तेत शिकत होता. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोण होणार बाळासाहेब ठाकरे स्माराकासाठीच्या ट्रस्टचे सदस्य