Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पश्चिम महाराष्ट्रात पावसाची संततधार; हाय अलर्ट जाहीर

पश्चिम महाराष्ट्रात पावसाची संततधार; हाय अलर्ट जाहीर
यंदा पूर्व महाराष्ट्रातून एन्ट्री घेतलेल्या पावसाने गेल्या काही दिवसांपासून चांगलाच जोर धरल्याने नागरिक सुखावले आहेत. तसेच, पश्चिम महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरु आहे. पुणे शहर व उपनगरात शनिवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. धरणक्षेत्रातही पावसाची संततधार सुरुच आहे. दरम्यान, सतर्क सिस्टिमने हाय अलर्ट जाहीर केला असून नागरिकांनी शक्यतो घाट भागातून प्रवास करणे टाळावे असे आवाहन केले आहे. जोरदार पावसामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेसह अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे लोणावळा, मालशेज आणि महाबळेश्वर यांसारख्या ठिकाणी सहलीकरिता जाणे नागरिकांनी टाळावे.
 
 
* महाबळेश्वरवरून परतणा-या प्रवाशांनी अंबानी घाटाऐवजी पासरानी घाट येथून प्रवास करण्याचे आवाहन
 
* आज सकाळी जुमापट्टीजवळ दरड कोसळल्याची घटना घडली असून घाटातील वाहतूक एकाच बाजूने सुरु ठेवण्यात आली आहे. दरम्यान घाटातील दरड हटवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
 
* पुणे शहरात साडे आठ वाजेपर्यंत ७३ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.
 
* पुणे धरण क्षेत्रात मागच्या १२ तासातील पाऊस, पानशेत ८८ मिमी, वरसगाव ७५ मिमी, टेमघर १२५ मिमी, खडकवासला ५२ मिमी.
 
* मुंबईसह कोकणात पुढील आठवडाभर मुसळधार पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
 
* तळकोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार.
 
* नागोठणे येथील कोळीवाडा, एस टी स्थानक, मरी आई मंदिर परिसर, भाजी मार्केट परिसर भागात पुराचे पाणी
 
* खोपोलीत इंडिया स्टील कंपनीची संरक्षक भिंत कोसळून वित्तहानी झाली. सुदैवाने कोणास इजा नाही. मात्र, चार वाहनांचे नुकसान.
 
* खोपोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग जनता विद्यालय रोड येथेसुद्धा नगरपालिका शाळा क्र. १ ची भिंत कोसळून एक रिक्षा व एक वेगनआर गाडीचे नुकसान
 
* पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये जोरदार पाऊस सुरूच एका रात्रीत वाढले अर्धा टीएमसी पाणी पाणी साठा १.७१ टीएमसी वरून २.२१ टीएमसी पाणी.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

#webviral झारखंड बीजेपी चीफ च्या मुलाने 11 वर्षाच्या मुलीशी केलं लग्न