Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पावसाळी अधिवेशनाचा समारोप; 5 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन

पावसाळी अधिवेशनाचा समारोप; 5 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन
मुंबई- 19 जुलै रोजी सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाचे अखेर सोमवारी सूप वाजले. आता पुढील हिवाळी अधिवेशन सोमवार, 5 डिसेंबर रोजी नागपूर येथे होईल, अशी घोषणा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली.
 
चालू सत्रातील कामकाजाचा आढावा घेताना बागडे यांनी सांगितले की, एकूण 15 दिवस कामकाज झाले. एकूण 105.49 मिनिटे कामकाज झाले. 
 
मंर्त्यांच्या अनुपस्थितीमुळे 10 मिनिटे व अन्य कारणांमुळे 7 तास 54 मिनिटे असे एकूण 8 तास 8 मिनिटे कामकाज वाया गेले. या सत्रात 11,284 तारांकित प्रश्न प्राप्त झाले. त्यातील 676 प्रश्न स्वीकृत करण्यात आले असून प्रत्यक्षात सभागृहात 56 प्रश्नांची तोंडी उत्तरे देण्यात आली. 
 
2,685 लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी 139 स्वीकृत होऊन प्रत्यक्षात 51 सूचनांवर चर्चा करण्यात आली. विधानसभेत 15 विधेयके मांडणत आली. तर दोन्ही सभागृह मिळून सात विधेयके संमत करण्यात आली. एकूण उपस्थिती 83.50 टक्के होती, असेही बागडे यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कुख्यात गुंड आणि नक्षलवादी नईमुद्दीन चकमकीत ठार