Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजपला खडसेंचा विसर

भाजपला खडसेंचा विसर
नाशिक- विविध आरोपांचा ठपका ठेवल्यामुळे मंत्रिपद गमवावे लागलेले एकनाथ खडसे यांना पक्षानेही बेदखल केले आहे की काय अशी चर्चा, कार्यकत्र्यांमध्ये दबक्या आवाजात रंगू लागली आहे. भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचा विस्तार आणि पदग्रहण सोहळा, नाशिकमधल्या भाजप कार्यालयात शनिवारी पार पडला. सोहळा निमित्ताने भाजप कार्यालयाबाहेर मोठे होर्डिग लावण्यात आले होते. त्या होर्डिगवर पंतप्रधान, मुख्यमंत्री, इतर नेत्यांचे फोटो होते. मात्र एकनाथ खडसेंच्या फोटोला त्यात स्थान नव्हते. 
 
एकनाथ खडसे उत्तर महाराष्ट्रातले भाजपचे ज्येष्ठ आणि वजनदार नेते आहेत. त्यांचे मंत्रिपद जाऊन जेमतेम आठवडाभराचा कालवधी लोटला आहे. आणि एवढय़ातच पक्षाने त्यांच्याकडे पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लेनोव्होचा पहिला फ्लेक्सिबल स्मार्टफोन!