Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठवाडा पाण्याखाली जोरदार पाउस

मराठवाडा पाण्याखाली जोरदार पाउस
, सोमवार, 3 ऑक्टोबर 2016 (10:53 IST)
मराठवाड्यातील सर्वच मोठ्या असलेलेया  जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने मोठा तडाखा   बसला आहे. सरसरी पेक्षा अधिक झालेल्या पाऊसाने  लातूर, नांदेड, उस्मानाबाद, बीड या क्घर जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती ओढवली आहे. मराठवाड्यातील अनेक नद्यांना पूर आल्यामुळे नांदेड आणि लातूर या जिह्यांतील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर नांदेड हैद्राबाद महामार्ग बंद झाला आहे. 
 
बीड जिल्ह्यातही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बीड मध्ये कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय ठिकठिकाणी वाहतूकही ठप्प झाली आहे. शहरातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला असून जवळपास 60 टक्के भाग पाण्याखाली आहे. बीडमधील पाटोदा तालुक्यातील दासखेडमध्ये 4 तलाव फुटल्यामुळे 13 जनावरांसह 6 गोठेही वाहून गेलेत.
 
तर लातूर येथील अहमदपूर तालुक्यातील मावलगावात भीषण पूरस्थिती निर्माण झाल्यानं आख्खं गाव अडचणीत सापडलं होतं. या गावाच्या मदतीसाठी एनडीआरएफची टीम धावून आली. या टीमने मावलगावातील ११ जणांना बोटींच्या माध्यमातून सुखरुपपणे बाहेर काढलं. अहमदपूर तालुक्यातल्या मावलगावचे हे अकरा शेतकरी काल शेतावर गेले होते, अचानक मन्याड नदीला पूर आला आणि शेतीला पाण्याचा वेढा पडला. त्यामुळं या शेतकऱ्यांना बाहेर पडता आलं नाही. . या टिमने बोटीच्या सहाय्याने या शेतकऱ्यांना बाहेर काढले. लहान मुलं, महिला आणि शेतकरी यांनी कालची रात्र पूर्णपणे पुराच्या वेढ्यात जागून काढली होती.
 
नांदेड जिल्ह्यात लिंबोटी धरणाचे १७ दरवाजे उघडल्याने डोंगरगाव इथे २३ गावकरी पुरामुळे झाडावर अडकले होते. त्यातील १५ जणांची सुटका करण्यात आली आहे.  लातूर ते नांदेड दरम्यानची वाहतूक बंद आहे. तसंच, नांदेडकडून सोलापूर, पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाकची बोट भारतात ९ ताब्यात