Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मला ओरिजनल राज व्हायला भाग पाडू नका

मला ओरिजनल राज व्हायला भाग पाडू नका
मुंबई- मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर इतर पक्षांचा मार्ग धरलेल्या मनसे नगरसेवकांना पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ‘ठाकरी’ शैलीत तंबी दिली. आतापर्यंत खूप लोकशाही पाळली, आता मला ‘ओरिजनल’ राज ठाकरे व्हायला भाग पाडू नका, असे त्यांनी नगरसेवकांच्या बैठकीत ठणकावले. त्यामुळे ‘ओरिजनल राज ठाकरे’ म्हणजे नेमके काय, यावरून तर्कवितर्काना उधाण आले आहे.
 
मुंबई महानगरपालिकेच्या पुढच्या वर्षी होणार्‍या निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. सगळ्याच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये सुरू असलेली धुसङ्खूस, त्यांच्यातील आरोप-प्रत्यारोप हाही त्याचाच भाग आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

15 लाख टन कांदा केंद्र खरेदी करणार