Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाड पूल दुर्घटना; दोन्ही बसचे सांगाडे सापडले

महाड पूल दुर्घटना; दोन्ही बसचे सांगाडे सापडले
महाड- महाडजवळ सावित्री नदीवरील पूल कोसळल्याने वाहून गेलेल्या दोन्ही एसटी बसचे सांगाडे आज तब्बल आठ दिवसांच्या अथक शोधमोहिमेनंतर नौदलाच्या पथकाला सापडले आहेत. पुलापासून साधारण 200 मीटरच्या परिसरातच गाळात रुतलेल्या या सांगाडय़ांपैकी मुंबई-जयगड बसचा सांगाडा जेसीबीच्या मदतीने पाण्याबाहेर काढण्यात आला आहे.
 
गेल्या मंगळवारी रात्री उशिरा सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन जीर्ण पूल कोसळला होता. तुङ्खान पावसानंतर नदीला आलेल्या पुरात, आयुङ्र्कान संपलेला हा पूल टिकाव धरू न शकल्याने भीषण दुर्घटना घडली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कबुतरे आणि माकडांचेही कुटुंबनियोजन