Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाडमधील मृतांची संख्या 27 वर

महाडमधील मृतांची संख्या 27 वर
महाड - महाडमधील सावित्री नदी पूल कोसळल्याने पुरात वाहून गेलेल्या वाहनांमधील आणखी दोन प्रवाशांचे मृतदेह आढळले असून आतापर्यंत एकूण 27 मृतदेह हाती लागले आहेत. दरम्यान, अजूनही किमान 15 जण बेपत्ता असून एनडीआरएङ्ख, नौदल व तटरक्षक दलाचे पथक स्थानिक लोकांच्या सहकार्याने त्यांचा शोध घेत आहेत.
 
केंबुर्ली आणि ओव्हळे अशा दोन ठिकाणी नदीपात्रात दोन मृतदेह आढळून आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सध्या सुरू आहे.
 
दरम्यान, बेपत्ता एसटीचा आणखी एक पत्रा विसावा हॉटेलजवळ नदीपात्रात सापडला आहे. याआधीही एसटी बस आणि तवेरा गाडीचे काही अवशेष पाण्यात सापडले होते. मात्र, या वाहनांचा मोठा भाग अद्याप हाती लागू शकलेला नाही.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजप असमर्थ; आम्हीच गायींचे रक्षण करू: शीला दीक्षित