Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रात पावसानं थैमान; 15 बळी

महाराष्ट्रात पावसानं थैमान; 15 बळी
मुंबई-  महाराष्ट्रात यंदा मात्र पावसानं थैमान घातलंय. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळं 15 बळी गेले आहेत.
 
कोल्हापूर जिल्हयात मुसळधार पाऊस सुरुच आहे. पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. सर्वाधिक पाऊस हा गगणबावडा तालुक्यात 293 मीमी इतका पडलाय. कोल्हापूर- रत्नागिरी राज्यमार्ग बंद झालाय.
 
बुलडाणा जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून सुरु असलेल्या सतंतधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या पूर्णा नदीला मोठा पुर आलाय. जिल्ह्यातील संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्याच्या संपर्क तुटला आहे.
 
सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. वारणा धरणात १८ टी एम सी पाणी साठा असून हे धरण ५३ हे टक्के भरल आहे. तर कोयना धरण ३९ टी एम सी पाणी साठा असून हे धरण ३७ हे टक्के भरल आहे. औदुंबर येथील दत्त मंदिरात कृष्णेच पाणी शिरलं आहे. सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 31 फुटावर गेली आहे. वडसा तालुक्यातल्या सावंगी येथील वैनगंगा नदीपात्रात बोट बुडाली. बोटीमध्ये असलेल्या १२ पैकी  १० लोकांना वाचवण्यात रेस्क्यू टीमला यश आल.
 
नांदेड जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. भोकर तालुक्यात एक व्यक्ती पुरात वाहून गेली. विष्णुपुरी धरण 90 टक्के भरल.
 
नंदूरबारमध्ये सर्वाधिक चार जण ठार झाले आहेत. तर अहमदनगर जिल्ह्यात दोन, ठाणे जिल्ह्यात दोन, चंद्रपूरमध्ये चार, अकोला आणि साता-यात दोन जणांचा बळी गेलाय.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काश्मीरमध्ये हिंसाचार कायम ; 23 जणांचा मृत्यू