Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस
मुंबई , सोमवार, 6 जून 2016 (10:36 IST)
कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला़ मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, कोकण-गोव्यात काही ठिकाणी व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़. पावसाने आठ जणांचा बळी घेतला आहे. पुढील चोवीस तासांमध्ये काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल,‘ असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.

पुण्यात शनिवारी संध्याकाळपासूनच ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरवात झाली. मध्यरात्री बारा वाजल्यानंतर पावसाच्या तुरळक सरींना सुरवात झाली. मात्र रात्री दीड वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढला. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी पडल्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एक्स्प्रेस-वेवरील अपघातानंतर शरद पोंक्षे यांची मोहीम