Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंडेंना फरार घोषित करणार

मुंडेंना फरार घोषित करणार
मुंबई- बीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह बँकेच्या आजी-माजी संचालकांना लवकरच फरार घोषित करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
घोषित करण्यात येणार्‍या आजी-माजी संचालकांमध्ये आमदार अमरसिंह पंडित, खासदार रजनी पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्यासह तब्बल 93 जणांचा समावेश आहे.
 
बीड जिल्हा बँकेतून विनातारण कर्ज मंजूर करणे, बेकायदा कर्जवाटप करणे आदींसह वेगवेगळ्या 14 गुन्ह्यांमध्ये अनेक नेत्यांसह बँकेच्या आजी-माजी संचालकांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी जिल्हा न्यायदंडाधिकार्‍यांकडे अखेर आरोप निश्चित करण्यात आले. आरोपपत्रात धनंजय मुंडे, खासदार रजनी पाटील यांच्यासह 93 जणांची नावे आहेत. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी छापे टाकले. मात्र, एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यामुळे सर्व आरोपींना लवकरच फरार घोषित करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सध्या भारतात येत नाहीये झाकीर नाईक