Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबई, पुण्यातील इंटरनेटवर डीडीओएसचा हल्ला!

मुंबई, पुण्यातील इंटरनेटवर डीडीओएसचा हल्ला!
मुंबई , मंगळवार, 26 जुलै 2016 (10:40 IST)
मुंबई, ठाणे तसंच पुण्यातील इंटरनेटवर डि‌स्ट्रिब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिसेस (डीडीओएस) चा हल्ला झाला आहे. तिन्ही शहरातील इंटरनेट सेवेवर परिणाम झाला असून याप्रकरणी सायबर सेलकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

काही दिवसांपासून या हल्ल्यात वाढ झाली आहे. जगभरातून एकाच वेळी हे हल्ले होत आहेत. डीडीओएसचा हल्ला 200 गिगाहर्त्झ प्रति सेंकद या वेगाने होत आहे. त्यामुळे याचा फटका इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या छोट्या कंपन्यांना बसत आहे. मुंबई, पुणे आणि ठाण्यात इंटरनेट पुरवणाऱ्या आयएसपी कंपनीच्या सर्व्हरवर हल्ला होत आहे. यामुळे इंटरनेट वापरणारे लॉग इन अचानक वाढतात.

याचा फटका बसल्याने इंटरनेट सेवा बंद होते. युझरसचा आयपी अॅड्रेस हॅक करण्यासाठी केला जातो. स्पॅमच्या माध्यमातून हे हल्ले होत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रेल्वे प्रवाशांना एक रुपयात 10 लाखांचा विमा