Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईतील हिंसेस मुख्यमंत्री जबाबदार- मुंडे

गोपीनाथ मुंडे यांचा आरोप

मुंबईतील हिंसेस मुख्यमंत्री जबाबदार- मुंडे

महेश जोशी

बीड , सोमवार, 18 फेब्रुवारी 2008 (19:27 IST)
मुंबईतील हिंसाचाराला विलासराव देशमुख आणि आर. आर. पाटील हेच जबाबदार असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे.
परप्रांतीयांच्या मुद्यांवरून मुंबईत हिंसाचार उसळला असताना मुख्यमंत्री आणि गृहखाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री शहराबाहेर होते.उभा महाराष्ट्र पेटला होता. मात्र दोन्ही नेत्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्याच दिवशी राज ठाकरे आणि अबू आझमी यांना अटक केली असती तर, मोठा अनर्थ टळला असता.असेही ते म्हणाले.

बीड येथे एका बँकेच्या उद्घाटनानंतर मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुंबईतील हिंसाचारापासून शेतकर्‍यांच्या आत्महत्यांपर्यंत अनेक मुद्यांवर मुंडे यांनी आघाडी सरकारला कैचीत धरले. मुंबईतील परिस्थिती हाताळण्यास राज्य शासन अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला.

शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी सरसकट कर्जमाफी हाच एकमेव मार्ग असल्याचे मुंडे यांनी सांगितले. पॅकेज देऊन शेतकर्‍यांचे भले होणार नाही. गेल्या वर्षी पंतप्रधानांनी विदर्भात शेतकर्‍यांसाठी पॅकेज दिले मात्र या पॅकेजमुळे बँकांना मोठा फायदा झाला. शेतकरी मात्र आहे त्याच परिस्थितीत आहेत. त्यामुळे संपूर्ण कर्जमाफी करून सरकारने शेतकर्‍यांच्या समस्या सोडवाव्यात. कर्जमाफीचा निर्णय घेताना त्यात कोणताही भेदभाव नको असे मत मुंडे यांनी व्यक्त केले.

गेल्या महिन्यात आपल्याला आणि आपले बंधू पंडितअण्णा मुंडे यांना निनावी पत्र आणि मोबाईलवर जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची माहितीही मुंडे यांनी दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi