Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्यमंत्र्यांची मातोश्रीवर ‘डिनर डिप्लोमसी’

मुख्यमंत्र्यांची मातोश्रीवर ‘डिनर डिप्लोमसी’
मुंबई , सोमवार, 18 जुलै 2016 (10:41 IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर जाऊन स्नेहभोजन घेतले. ‘डिनर डिप्लोमसी’तून भाजपा व शिवसेना सोबत असल्याचा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

एकदिलाने काम करून राज्याचा विकास करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धवठाकरे यांनी स्पष्ट केले. अधिवेशनात सर्व मुद्द्यांवर शिवसेना भाजपासोबत असेल, अशी ग्वाही  ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचे समजते.

भाजपा-शिवसेना युतीत तणावाचे वातावरण निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या आरोपांचा सामना करण्यासाठी शिवसेनेची सोबत असावी, यासाठी ‘डिनर डिप्लोमसी’तून भाजपा व शिवसेना सोबत असल्याचा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘इसिस’शी संबंध; पुण्यात पाच जण ताब्यात