Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यंदा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ पाच दिवस

यंदा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ पाच दिवस
, शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016 (17:18 IST)
पुण्याची सांस्कृतिक ओळख असलेल्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे’ आता नियोजन सुरु झाले आहे. दरवर्षी आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा दिनांक ७ ते ११ डिसेंबर दरम्यान न्यू इंग्लीश स्कूल, रमणबाग येथे महोत्सव पार पडणार आहे. यंदा महोत्सवाचे ६४ वे वर्ष असून यावर्षी महोत्सव चार ऐवजी पाच दिवस होणार आहे. दरवर्षी शेवटच्या दिवशी होणारे रविवार सकाळचे सत्र यावर्षी रद्द करीत, महोत्सव पाच दिवस केवळ सायंकाळच्याच सत्रात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली आहे. महोत्सवाचा इतर तपशील काही दिवसांत जाहीर करण्यात येईल. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नखं का कुरतडतात लोकं!