Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज ठाकरे-फडणवीस यांची गुप्त चर्चा

राज ठाकरे-फडणवीस यांची गुप्त चर्चा
मुंबई , शुक्रवार, 10 जून 2016 (09:21 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’निवासस्थानी दोन्ही नेते भेटले. नीट परीक्षेच्या घोळासंदर्भात ही भेट झाली. त्यानंतर दोघांची एकांतमध्ये गुप्त चर्चा झाली.
 
गेल्या आठवडय़ात नीटच्या अध्यादेशामुळे कुठलाही दिलासा मिळाला नसल्याची तक्रार काही पालकांनी राज ठाकरेंकडे केली होती. या भेटीदरम्यान काही पालकही उपस्थित होते. मात्र ही चर्चा झाल्यानंतर ठाकरे आणि ङ्खडणवीस यांनी तब्बल 20 मिनिटे एकांतात गुफ्तगू केले. त्यामुळे राज्यातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही या दोघांनी चर्चा केल्याचे सांगण्यात येते.
 
दरम्यान, खासगी कॉलेजाना ‘सीईटी’ लागू नसल्यामुळे केंद्राच्या अध्यादेशाचा काहीच फायदा नसल्याची भावना पालकांनी बोलून दाखवली. यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांच्याशी बोलून तोडगा काढू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मेक्सिकोचे राष्ट्राध्क्ष बनले मोदींचे सारथी