मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने आज आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करत दहा नव्या चेहर्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे. शिवसेनेच्या एका मंत्र्याला बढती देत कॅबिनेटमंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेची उपेक्षा करण्यात आली होती आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या सोहळ्याकडे पाठ फिरविल्यामुळे ही नाराजगी स्पष्ट कळून आली. शिवसेनेचे राम शिंदे यांना बढती देण्यात आली असून त्यांनाही कॅबिनेटमंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे.
पांडुरंग फुंडकर, प्रा. राम शिंदे, जयकुमार रावल, संभाजी निलंगेकर पाटील, सुभाष देशमुख, महादेव जानकर यांना कॅबिनेटमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. तसेच अर्जुन खोतकर, रवींद्र चव्हाण, मदन येरावार, गुलाबराव पाटील, सदाभाऊ खोत यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.