मुंबई- राज्यभरात 2 कोटी झाडं लावण्याचा महाराष्ट्र वनविभागाचा संकल्प पूर्ण झाला आहे. राज्यभरात 2 कोटी 22 लाख वृक्षांची लागवड झाल्याचा दावा वनविभागाने केला आहे.
वृक्ष लागवडीसंदर्भात केलेल्या आवाहनाला राज्यातील जनतेनं उदंड प्रतिसाद दिल्याचं पाहायाला मिळालं, सरकारी कर्मचारी, वन विभागाचे अधिकारी, शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी अशा सर्व स्तरातील लोकांनी मोठ्या उत्साहानं वृक्षारोपण केलं.
जिथं गरज असेल तिथं खांद्याला खांदा लावून उभा राहीन, अपशकून करणार नाही. असं आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलं. तर वृक्षारोपणच्या मोहिमेत उद्धव ठाकरेंनी झाड लावलं. मी माती आणि पाणी घातलं. त्यामुळे यातून योग्य संदेश जाईल. आम्ही लावलेल्या रोपाचा वटवृक्ष होईल, अशी अशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. कुर्ला परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आलं. त्यानंतर आयोजित सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते.
या कार्यक्रमाला राज्यपाल विद्यासागर राव, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह अनेक दिग्गज व्यासपीठावर होते.