Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रेशन न घेतल्यास शिधापत्रिका 'पॉज'!

रेशन न घेतल्यास शिधापत्रिका 'पॉज'!
मुंबई , गुरूवार, 25 ऑगस्ट 2016 (11:34 IST)
रेशनिंग  दुकानातून  3 महिने धान्य न घेतल्यास शिधापत्रिका रद्द होणार आहेत. याच्या अमंलबजावणीसाठी 52 हजार रेशनिंगच्या दुकानात पॉज मशिन बसवण्याचं काम सुरु आहे..

अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने हा निर्णय घेतला आहे. या विभागाकड़ून सध्या शिधापत्रिका आधार कार्डशी जोडण्याचं काम सुरु आहे. त्याद्वारे बोगस शिधापत्रिकांना आळा बसण्यास तसेच बनावट नावे वगळण्यास मदत होणार आहे.सध्या पॉज मशिन बसवण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु आहे. या मशिनसाठी राज्य सरकार कुठलीही गुंतवणूक करणार नसून संबंधित कंपनीला प्रत्येक क्विंटलमागे कमिशन देण्यात येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मनसेची 40 फुटांवर ‘कायदाभंग’ दहीहंडी!