शिवसेना गोवा विधानसभेच्या 20 जागा लढविणार असल्याची शक्यता असून शिवसेना भाजपला शह देण्यासाठी गोव्याचे माजी संघप्रमुख सुभाष वेलिंगकर यांच्यासोबत जाणार आहे. सुभाष वेलिंगकर यांनी योग्य प्रस्ताव दिल्यास गोव्यात युती करण्याची तयारी शिवसेनेने दर्शवली आहे.
गोवा विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर गोव्यात संघामध्ये फूट पडली आणि सुभाष वेलिंगकर यांनी भाजपला पराभूत करण्यासाठी निवडणुकीच्या आखाडय़ात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.