Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सामना कार्टून प्रकरण शिवसेनेत राजीनामा सत्र की स्टंट ?

सामना कार्टून प्रकरण शिवसेनेत राजीनामा सत्र की स्टंट ?
, बुधवार, 28 सप्टेंबर 2016 (10:20 IST)
‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्रामुळे आता शिवसेनेत राजीनामासत्राला सुरुवात झाली आहे. बुलडाण्यात शिवसेनेच्या दोन आमदार आणि एका खासदाराने राजीनामा दिला आहे. मात्र हे खरच राजीनामे की प्रकरण झाकण्यासाठी केलेली धूळफेक आहे असा प्रश्न समोर आला आहे.
 
शिवसेनेचे भोकरदन तालुकाप्रमुख कैलास पुंगळे यांनी तालुकाप्रमुख आणि बाजार समिती संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांना व्हॉट्सअॅप मेसेज करुन पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेच्या पदांचा राजीनामा देऊन ‘सामना’चा निषेध व्यक्त केला आहे.
 
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यासंदर्भात पत्रक काढून शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. व्यंगचित्राप्रकरणी सुरु असलेल्या राजकारणामागे काँग्रेस-राष्ट्रवादी आहे. मात्र त्यांचा हा विघ्नसंतोषीपणा खपवून घेतला जाणार नाही. असंही सेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
 
मराठा क्रांती मोर्च्यावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये ‘अतिविराट मुका मोर्चा’अशा आशयाचं एक व्यंगचित्र छापण्यात आलं. साहजिकच या व्यंगचित्राचे तीव्र पडसाद उमटले आहेत. शिवसेनेन उशिरा पर्यंत याला कोणताही दुजोरा दिला नाही.मात्र दसरा मेळावा आता लोक कुठून येणार असा मेसेज सोशल मेडीयावर फिरत असून शिवसेनेला कार्टून चांगलेच महागात पडणार आहे असे सध्या महाराष्ट्रात चित्र आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारताचा सार्क परिषदेवर बहिष्कार