Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही

हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही
मुंबई- दुचाकीस्वरांनी हेल्मेटचा वापर करावा, यासाठी राज्याचे परिवडन मंत्री दिवाकर रायते यांनी एक महत्त्वाची घोषणा विधान परिषेदत केली. यापुढे जर दुचाकीस्वाराकडे अर्थात चालक आणि त्याच्या मागे बसलेल्याकडे हेल्मेट नसेल तर त्याला पेट्रोल पंपावर पेट्रोल देऊ नये, अशी घोषणा करण्यात आली आहे. दुचाकीवरील चालक आणि त्याचा सहप्रवासी असे दोघांनी हेल्मेट परिधान करणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
 
येत्या 1 ऑगस्टपासून या नियमाची अंमलबजावणी करण्याचेही निर्देश पेट्रोल विक्रेत्यांना देण्यात आले आहे. दुचाकीस्वरांना प्रवृत्त करण्यासाठी राज्य सरकाराने हा नियम केला आहे.
 
गेल्या महिन्यात तेलंगणातील अदिलाबाद जिल्ह्यात प्रशासनाकडून हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांना पेट्रोल न देण्याची घोषणा करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मंत्री दिवाकर रावते यांनी हेल्मेट घातलेल्या दुचाकीस्वारांनाच पेट्रोल देण्यात यावे असा निर्णय जाहीर केला आहे. दुचाकीवरील चालक आणि त्याचा सहप्रवासी यांना हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे. 
 
राज्यात यापूर्वीही दुचाकी चालकांना हेल्मट सक्ती करण्यात आली होती. मात्र, अनेक ठिकाणी यास विरोध करण्यात आला. तर नागरिकांचाही थंडा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे याची अंमलबजावणी करण्याचे आव्हानही वाहतूक पोलिसांसमोर होते. मोटरवाहन कायद्याप्रमाणे राज्यात दुचाकीस्वारांना हेल्मट बंधनकारक आहे. पण चालकांचा यास विरोध होत होता. आता हेल्मेट नसणाऱ्यांना पेट्रोल न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे त्यास नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पहावे लागणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जीभ कापून आणा; 50 लाख मिळवा