ढग येतात पण थेंब पडत नाही
दाटून आठवणी येतात पण तू कुठे दिसत नाही
काय मी सांगू तुझ्यापुढे
जसे गाय मागे वासरू
सांग आई आता तूच
मी तुला कसे विसरू
भावपूर्ण श्रद्धांजली
आई तुझ्या शिवाय एकही दिवस काय एक क्षण देखील माझा जात नाही
पण आता तुझ्या आठवणींशिवाय मला आयुष्यात कुठलाच आधार नाही
भावपूर्ण श्रद्धांजली
आई तुझ्या मायेची उब आजही मला जाणवते
कपाटातील तुझी साडी पाहिली की
त्यात तुझी प्रेमळ माया जाणवते
काय सांगू आई..तुझी खूप आठवण येते.
माझ्या आठवणींच्या कप्प्यात तुझी जागा आजही तशीच आहे
आई आज आमच्यात नाहीस
यावर माझा विश्वासच होत नाहीये
भावपूर्ण श्रद्धांजली
आई तुझा आवाज आता कानी पडणार नाही
माझ्या डोक्यावर तुझा हात कधीच फिरणार नाही
याचे दु:ख होत आहे
पण तू जिथे असशील
माझ्यावर माया करशील
माझ्यावर लक्ष ठेवशील
हे नक्की जाणून आहे
नसतेस जेव्हा तू घरी
मनात काहीतरी तर खटकतं
एकटे एकटे वाटते
भोवती इतकी लोकं असूनही
कायम एकटे जाणवते
आई तुला भावपूर्ण श्रद्धांजली
तू का गेली सोडून
तुला माहित आहे ना
तुझ्याविना माझ्या आयुष्यातील
एक पान देखील हलत नाही
मला तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही
आई म्हणजे देवाकडून
भरभरुन मिळालेले आशीर्वाद
विधात्याच्या कृपेचं निर्मळ वरदान
तुझी आठवण कायम येत राहील.
तुझा प्रेमळ चेहरा
डोळ्यासमोर जात नाही
तुझ्या मायेचा हात
हवा हवासा वाटतो
वचन दे मला आई
पुढच्या जन्मीही तुझ्या पोटीच मला जन्म देशील