स्वत:ला विसरते
मात्र घरातील इतरांसाठी
सतत धावपळ करते
सर्वांना प्रेमाने बांधून ठेवणार्या माझ्या प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या सर्व चुकांना पदरात घेऊन माफ करणारी
खूप रागात असतानाही मनापासून प्रेम करणारी
आशीर्वाद देण्यासाठी कायम तत्पर असणारी
एकमेव व्यक्ती म्हणजे माझी आई
आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
प्रत्येक जन्मी तुझ्या पोटी जन्म मला मिळावा
तुझ्याच असण्याने जीवनाचा खरा अर्थ मला समजला
आई वाढदिवसाच्या शुभेच्छा
तू जीवनभर खूप कष्ट सोसले
आता येणारा प्रत्येक क्षण
तुझ्या आयुष्यात केवळ आनंद घेऊन यावा,
यासाठी मी कायम प्रयत्नशील असेल,
तुझ्या सगळ्या कष्टांचे मी चीज करेन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मी कलेकलेने वाढत असताना
तू कधीच केला नाही स्वत:चा विचार
आई आज आहे तुझा वाढदिवस,
आता तरी स्वत:साठी थोडा वेळ काढ
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
माझ्या आयुष्यातील यशाच्या
शिड्या जिच्या जिववार मी चढल्या
अशा माझ्या कष्टाळू आईला
वाढदिवसाच्या शुभेच्छा
जगासाठी तू एक व्यक्ती असशील
पण माझ्यासाठी तू माझं जग आहेस
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
जगातली सारी सुखं तुझ्या पायाशी लोळू देत,
तुझ्या असण्याने माझे जग कायम बहरलेले असू देत
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
कितीही काळ लोटला तरी
माया तुझी ओसरत नाही,
तुझ्या वाढदिवशी तुझी आठवण
येणार नाही असे कधीच शक्य नाही
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तू आम्हाला दिलेल्या आनंदाचे क्षण
तुझ्या आयुष्यात दुपटीने येवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा