Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Parenting Tips: वयाच्या 10 व्या वर्षी मुलांना या गोष्टी शिकवा, कामी येतील

Parenting Tips
, मंगळवार, 2 जानेवारी 2024 (13:48 IST)
Parenting Tips:पालकत्व हे खूप कठीण काम आहे. मूल जसजसे मोठे होत जाते, तसतसे पालकांना वाटते की त्यांच्या जबाबदाऱ्या कमी होत आहेत, परंतु प्रत्यक्षात तसे नाही. लहान मुल मोठे झाल्यावर घरातूनच अनेक गोष्टी शिकत असते. पालकांनी सांगितलेल्या गोष्टी त्यांना बाहेरच्या जगात एक चांगला माणूस बनण्यास मदत करतात. एवढेच नाही तर जेव्हा तुम्ही मुलाला एखादी गोष्ट सांगता किंवा समजावून सांगता तेव्हा त्याचे वय किती आहे हे देखील समजून घ्यावे. मुलं 10 वर्षाची झाली की त्यांना या काही गोष्टी आवर्जून शिकवा. हे त्यांच्या कमी येतील. चला तर मग जाणून घेऊ या.
  
त्यांना न आवडणारे काम कधीही नका करू -
या वयापर्यंत, मुलांना त्यांच्या गटात स्वतःसाठी एक विशेष स्थान निर्माण करायचे आहे. मित्रांमध्ये लोकप्रिय होणं खूप गरजेचं आहे.असं त्याला वाटतं या मुळे तो कधी कधी  इतरांना खुश करायला न आवडणारे काम देखील करतो.त्याला समजावून सांगा. की त्याने न आवडणारे काम कधीही करू नये. 
 
पालक मुलांचे मित्रच असतात- 
वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत तुम्ही मुलाला समजावून सांगा की तुम्ही त्यांचे शत्रू नाही. तो तुमच्यावर विश्वास ठेवू शकतो, त्याच्या समस्या तुमच्याशी शेअर करू शकतो आणि तुमची मदत मागू शकतो. मात्र, या काळात त्यांना लांबलचक व्याख्याने देऊ नका. तसेच मुलांवर ओरडणे टाळा. यामुळे मुले त्यांच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार नाही. तुमच्याशी बोलायला टाळाटाळी करेल.
 
त्यांना शरीराची माहिती द्या
मुलगा असो किंवा मुलगी, आई वडिलांसाठी दोन्हीही समान असतात. वयाच्या 10 वर्षानंतर शरीरात परिवर्तन होऊ लागतात. आई-वडिलांनी वयाच्या दहाव्या वर्षी प्रत्येक मुलाला त्यांच्या शरीराचे मूलभूत ज्ञान दिले पाहिजे. हे असे वय आहे जेव्हा मूल वेगाने वाढते. तुम्ही त्यांना फक्त गुड टच आणि बॅड टच बद्दल सांगू नका. त्यापेक्षा वैयक्तिक स्वच्छतेशी संबंधित काही गोष्टीही त्यांच्यासोबत शेअर कराव्यात. जेणे करून त्यांना व्यवस्थित माहिती मिळेल. 
 
मार्क्स पेक्षा ज्ञान महत्त्वाचा आहे -
कधीकधी पालक त्यांच्या मुलाच्या ग्रेड किंवा गुणांमुळे खूप नाराज होतात जे त्यांच्या अपेक्षा पूर्ण करत नाहीत. तथापि, चांगली ग्रेड नेहमीच चांगल्या ज्ञानाचे लक्षण नसते. तुम्ही तुमच्या मुलाला शिकवले पाहिजे की ज्ञान ग्रेडपेक्षा महत्त्वाचे आहे. तुम्ही त्यांना सांगावे की त्यांनी नेहमी काहीतरी नवीन शिकण्याचा आणि त्यांचे ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्याकडून चूक झाली तरी त्यांना घाबरण्याची गरज नाही कारण प्रत्येक चूक त्यांना काहीतरी नवीन शिकवते.त्याच्या चुकांवर त्याला रागावू नका. समजावून सांगा. 
 
सर्वांचा आदर करा- 
ती मुलगी आहे, तिचा आदर करा असे पालकांना तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण प्रत्यक्षात तुम्ही त्यालाशिकवा की त्याने मुली आणि मुलगा दोघांचाही आदर केला पाहिजे. ते समान आहेत. तुमच्या मुलाला लिंगाच्या आधारावर इतरांचा आदर करायला कधीही शिकवू नका. जशी मुलगी आदरास पात्र आहे, त्याचप्रमाणे मुलालाही त्या सन्मानाचा अधिकार आहे. इतकेच नाही तर लहानपणापासूनची ही लिंगभेदाची भावना भविष्यात त्याला त्रास देऊ शकते.इतकेच नाही तर भावनिक होणे किंवा रडणे ही पुरुषांच्या भावनांची अभिव्यक्ती मानली जात नाही तर त्यांची कमजोरी मानली जाते. त्यामुळे लहानपणापासूनच मुलाला समानतेचा धडा शिकवा.
 
Edited By- Priya Dixit

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Steamed Kabab स्टीम कबाब