Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शारीरिक संबंध बनवल्याने चेहर्‍यावर येतो ग्लो

sex2
, गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023 (08:50 IST)
काय शारीरिक संबंध ठेवल्यानंतर चेहर्‍यावर ग्लो येतो? ही गोष्ट आपल्याला थट्टा वाटत असली तरी अनेक स्टडीमध्ये हे परिणाम समोर आले आहे. 
 
या ग्लोला पोस्टकॉइटल ग्लो म्हणतात. जर्नल सायकोलॉजिकल सायन्स मध्ये प्रकाशित शोधप्रमाणे संबंध ठेवल्याच्या 48 तासांपर्यंत हा ग्लो टिकून राहतो. तर अजून एका सर्व्हप्रमाणे यानंतर लोक रिलॅक्स फील करतात.
 
तर एका इतर स्टडीप्रमाणे रक्तातील ऑक्सिटोसिनच्या लो लेव्हलमुळे तणाव, टेंशन आणि एंग्जाइटी डिसऑर्डर यात थेट संबंध आहे. याशिवाय तणावाखाली राहण्याचा पहिला आणि सर्वात वाईट परिणाम त्वचेवर होतो.
 
तर मिशिगन विद्यापीठात प्रकाशित 2009 च्या अभ्यासानुसार, संबंध बनवल्यानंतर पुरुषांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते. तर महिलांच्या शरीरात इस्ट्रोजेनचे प्रमाण वाढते. हे देखील फायदेशीर आहे कारण ही दोन्ही रसायने त्वचेतील सुरकुत्या किंवा वृद्धत्व रोखण्यात अनेक प्रकारे मदत करतात.
 
हे शरीरात कोलेजनची कमतरता देखील प्रतिबंधित करतात. कोलेजन हे एक महत्त्वाचे प्रोटीन आहे जे शरीराची त्वचा तरुण ठेवण्यास मदत करते. हे त्वचेला सुरकुत्यापासून संरक्षण करण्यास मदत करतं आणि त्वचेची लवचिकता टिकवून ठेवणारे तंतू देखील निरोगी ठेवतात. 
 
खरं तर संबंध ठेवताना संपूर्ण शरीरातील ब्लड सप्लाय वाढतं. ज्याने चेहर्‍यापर्यंत जाणार्‍या रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण पोहचू लागतो. आणि चेहरा गुलाबी दिसू लागतो.
 
तरं निरोगी शारीरिक संबंध केवळ आपले शरीरच नाही तर मन देखील निरोगी ठेवतं. अनेक संशोधनांमध्ये हे देखील सिद्ध झाले आहे की निरोगी त्वचेचा थेट संबंध निरोगी शरीर आणि मनाशी असतो. सेक्समुळे चेहऱ्यावर आलेली चमक कोणत्याही क्रीमने किंवा लोशनने मिळवता येत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Dry Fruits Halwa चविष्ट ड्रायफ्रूट्स हलवा रेसिपी