Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Relationship Tips:या सवयींमुळे तुमचा पार्टनर दुखावला जाऊ शकतो, नात्यात दुरावा येऊ शकतो

Relationship Tips:या सवयींमुळे तुमचा पार्टनर दुखावला जाऊ शकतो, नात्यात दुरावा येऊ शकतो
, सोमवार, 25 जुलै 2022 (15:01 IST)
Habits You Should Avoid: तुमच्या नात्यातील गरजा समजून घेणे आणि त्याची जबाबदारी उत्तम प्रकाराची घेणे हे प्रत्येक चांगल्या जोडीदाराचे कर्तव्य आहे, पण काही सवयी अशाही असतात ज्यामुळे तुमच्या नात्याला तडा जाऊ शकतो. कोणत्याही नात्याचा पाया प्रेम, विश्वास आणि आदर यावर असतो. 
 
जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराशी तुमच्या सुख-दु:खाबद्दल, गरजा आणि इच्छांबद्दल बोलता तेव्हा त्यामुळे तुमचे नाते आणखी घट्ट होते, पण कधी कधी संवादाची पद्धत आणि काही वाईट सवयीही नाते तुटण्याचे कारण बनतात. जेव्हा दोन व्यक्तींमध्ये संवादाचे मोठे अंतर असते तेव्हा जोडीदाराला मनातल्या भावना समजावून सांगणे खूप कठीण होऊन बसते. अशा परिस्थितीत नातं टिकवून ठेवण्यासाठी त्या सवयी वेळीच सोडणं हा उत्तम पर्याय आहे.
 
1 जोडीदारावर नेहमी टीका करणे-
तुमच्या जोडीदारावर बोलण्यातून टीका केल्याने तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. . प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीवर पार्टनरला टोकणं ही चांगली गोष्ट नाही, जर तुम्हाला तुमच्या पार्टनरबद्दल काही वाईट वाटलं तर त्यांना प्रेमाने समजावून सांगा. तुमच्या जोडीदाराशी बोलताना कोणतेही चुकीचे शब्द वापरू नका, कारण असे शब्द किंवा टीका केल्याने तुमचे नाते बिघडू शकते.
 
2 वितंडवाद करणे -
अनेकांना अशी सवय असते की त्यांना कोणत्याही गोष्टीवर वाद घालावे लागतात. जर तुम्हाला वाद घालण्याची सवय असेल आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराशी वाद घालत असाल तर ते तुमच्या नात्यासाठी धोकादायक ठरू शकतं. कधी कधी काही शुल्लक कारणांवरून वाद होतात. त्याचा थेट परिणाम नात्यावर होतो. अनेकदा दोघेही आपली चूक मान्य करायला तयार नसतात, आणि नात्यात दुरावा वाढू लागतो.
 
3 चेष्टा करणे-
नातेसंबंध तुटण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे तुमच्या जोडीदाराची नेहमी चेष्टा करणे. आपल्या जोडीदाराची सर्वांसमोर वारंवार चेष्टा करणे योग्य नाही. अनेकांना सवय असते की ते प्रत्येक गोष्टीची चेष्टा करतात. जर तुम्हालाही अशी सवय असेल तर ती लगेच सोडा, कारण वारंवार तुमच्या जोडीदाराची चेष्टा करणे हे नात्यात दुरावा निर्माण करतात. 
 
4 इतरांशी तुलना करणे -
चांगले नाते टिकवण्यासाठी तुमच्या जोडीदाराची इतरांशी कधीही तुलना करू नका. तुलना कोणालाच आवडत नाही. एखाद्या गोष्टीवर वितंडवाद झाल्यानंतर,आपण कोणत्यातरी बाजूने जोडीदाराची तुलना करू लागतो, परंतु हे अजिबात चांगले नाही. प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे की, प्रत्येक व्यक्ती आणि त्याचा स्वभाव वेगळा असतो आणि नात्यात थोडी तडजोड करणे देखील आवश्यक आहे. तुम्हालाही तुलना करण्याची सवय असेल तर ती वेळीच सोडून टाकणे.
 
5 गोष्टी मनात धरून ठेवणे -
जिथे प्रेम असते तिथे भांडणे होणे स्वाभाविक असते आणि जिथे सहमती असते तिथे मतभेदही होतात, पण गोष्टींना धरून ठेवणे खूप घातक ठरू शकते. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत काही समस्या असल्यास, बसून मोकळे पणाने बोला आणि काही समस्या असल्यास सोडवा. मनात  गोष्टी धरून ठेवल्या मुळे हळूहळू नातं तुटतं. कोणतीही गोष्ट मनात धरून ठेवण्याची सवय असल्यास ती लगेच सोडून द्या आणि शक्य तितक्या मोकळेपणाने जोडीदाराशी बोला.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Career in MDS Oral Surgery After Graduation : पदवीनंतर एमडीएस ओरल सर्जरीमध्ये करिअर करा, पात्रता, अभ्यासक्रम, व्याप्ती, पगार जाणून घ्या