Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 13 April 2025
webdunia

Relationship Tips : पतीने घर कामात मदत करण्यासाठी या टिप्स अवलंबवा

Relationship Advice  Relationship Tips Follow these tips to help your husband with housework  Ask for help  Dont criticize in front of others  Ask to do small Things   Praise
, शुक्रवार, 7 एप्रिल 2023 (22:53 IST)
Relationship Advice:  स्त्रिया आणि पुरुषांच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. पती नोकरी किंवा बाहेरील काम सांभाळतो आणि पत्नीने कुटुंबाची काळजी घेणे अपेक्षित असते. गृहिणी असो की नोकरदार महिला, सर्वच घरातील कामे करतात. मात्र, कुटुंब सांभाळणे सोपे नाही. महिलांना त्यांच्या पतींनी घरातील कामात मदत करावी अशी अपेक्षा असते. घरातील कामावरून अनेकदा पती-पत्नीमध्ये भांडणे होतात. पतीने आपल्यासोबत घर सांभाळावे, मुलांची काळजी घेण्यासोबतच घरातील कामात मदत करावी असे पत्नीला वाटत असते. पतीची घर कामात मदत मिळवण्यासाठी महिलांनी या टिप्स अवलंबवावे.
 
मदतीसाठी विचारा-
जर पत्नीला पतीने घरातील कामात मदत करावी असे वाटत असेल तर यासाठी पतीला आदेश देऊ नका. त्यांना मदतीसाठी विचारा, गोष्टी करण्यासाठी दबाव आणू नका. जेव्हा तुम्ही तुमच्या पतीकडून काही कामासाठी सहकार्य मागता तेव्हा ते ही तुम्हाला साथ देतात, पण तुम्ही त्यांच्याशी भांडण करून किंवा जबरदस्तीने काम करण्यास सांगितले तर ते तुम्हाला घरच्या कामात मदत करणार नाही.
 
इतरांसमोर निंदा करू नका
तुम्ही तुमच्या पतीला मदत करण्यासाठी बोलू शकता परंतु त्यांनी मदत करावी म्हणत  कुटुंबातील इतर सदस्यांसमोर किंवा मुलांसमोर त्यांची निंदा करू नका. जर तुमची इच्छा असेल की त्यांनी काही काळ मुलांची काळजी घ्यावी, तर मुलांसमोर त्यांना काहीही बोलू नका, परंतु खाजगीत त्यांना समजावून सांगा की ते काय मदत करू शकतात. 
 
छोट्या छोट्या गोष्टी करायला सांगा-
 पतीकडून मदत मिळवण्यासाठी आधी त्यांना छोट्या छोट्या गोष्टी करायला सांगा. त्यांना घरातील असे कोणतेही काम करण्यास सांगू नका, जे ते करू शकत नाहीत. नवऱ्याला ज्या कामात कुवत आहे ते करायला लावा. जास्त कामांची अपेक्षा करू नका. तसेच त्यांना तुम्ही जेवढे काम करता तेवढे करायला सांगा.
 
 प्रशंसा करा
जर पती तुम्हाला घरच्या कामात थोडीशी मदत करत असेल तर त्याची प्रशंसा करा.  मदत केल्याबद्दल किंवा घराची काळजी घेतल्याबद्दल तुम्ही तुमच्या पतीचे आभार मानू शकता. त्यांच्या कामाचे कौतुक करता येईल. पती यामुळे आनंदी होईल आणि पुढच्या वेळीही तुम्हाला मदत करेल.
 
Edited By - Priya Dixit 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्यथा-बळीराजाच्या आणि... : चिंतनीय लेखसंग्रह!