Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सेवानिवृत्ती शुभेच्छा मराठी Retirement Wishes

सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा
आयुष्याच्या या नव्या प्रवासाचे नाव असले जरी सेवानिवृत्ती
तरी तीच घेऊन येईल तुमच्या आयुष्यात एक नवी क्रांती… 
सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा
 
सोडून जीवनाच्या या टप्प्याची साथ तुम्ही दूर नाही तर 
आपल्या लोकांमध्ये जाणार
वाईट वाटून घेऊ नका 
आठवणी सदैव ताज्या राहणार
सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा
 
हा क्षण आहे आनंदाचा
आता तुम्ही जगू शकाल 
आयुष्यातील प्रत्येक उरलेला क्षण प्रेमाचा
सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा
 
जीवनभर जबाबदारीने तुम्ही कष्ट केले अपार
आता ही वेळ म्हणते जरा सावकाश घ्या आणि करा थोडा आराम.. 
सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा
 
शेवटी सेवा निवृत्तीचा दिवस आला
खरं तर अगदी मनासारखं करण्याचा काळ आला
जे जे तुम्ही ठरवलं ते आता बिनधास्त करा
तुम्हाला हवे असलेलं सर्व काही मिळवा.. 
सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा
 
सोडून जात असला ऑफिस तरी 
मनातून दूर तुम्ही कधीच होणार नाही
खात्री आहे आम्हाला 
आमच्याशिवाय तुम्हालाही करमणार नाही..
सेवा निवृत्ती शुभेच्छा
 
आयुष्यातील तुमच्या या नव्या प्रवासासाठी 
तुम्हाला माझ्याकडून मन:पुर्वक शुभेच्छा
 
आता नको ती घड्याळाची टिक-टिक
नको कामाचा ताण 
सेवा निवृत्तीनंतरचे आयुष्य 
जगा एकदम झक्कास.. 
सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा
 
इतकी वर्षे केली नोकरी 
आज थोडे निवांत घ्या
सेवानिवृत्त होताय आता 
थोडे दमाने घ्या
सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा
 
नाही नाही म्हणता म्हणता वर्षे इतकी सरली
तरीही तुझी माझी दोस्ती कधीच नाही विरली
सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा
 
आयुष्याच्या सेंकड इनिंगचा सदुपयोग करा
मस्त फिरा आणि स्वस्थ राहा
सेवानिवृत्ती लखलाभो
 
लहानपण देगा देवा...
खंत करु नका
लहानपणी न जोपासलेले छंद आता जपा
पुन्हा नव्याने बालपण अनुभवा
 
तुमचा जागी उद्या कुठी नवीन येईल
पण आमच्या मनातील तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही… 
सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा
 
याला सेवा निवृत्ती किंवा रिटायरमेंट काहीही म्हणा 
मात्र यापुढे जीवनात येणारा प्रत्येक क्षण 
तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जगा.. 
सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मासिक पाळीनंतर किती दिवसांनी शारीरिक संबंध ठेवावेत? योग्य माहिती जाणून घ्या