छत्तिसगढ राज्यात खणताना एक असे शिवलिंग सापडले ज्यात तुळशीचा सुगंध दरवळतो. तज्ज्ञांचा दावा आहे की हे लिंग 2000 वर्ष जुने आहे आणि द्वादश ज्योतिर्लिंगात असलेल्या पत्थरांपासून निर्मित केलेले आहे. हे ज्योतिर्लिंग अनेक ऐतिहासिक वस्तू, सभ्यता आणि त्याहून जुळलेल्या प्रसंगांची आठवण करवून देतं.
छत्तिसगढाच्या महासमुंद जिल्ह्यात सिरपुरमध्ये खणताना पुरातत्त्व तज्ज्ञांना हे शिवलिंग प्राप्त झाले. हे शिवलिंग 4 फूट लांब आणि 2.5 फूट गोलाकार आहे. या शिवलिंगावर जानवं आणि असंख्य शिव धारी आधीपासूनच अंकित होत्या.
निष्कर्षातून माहीत पडले आहे की हजारो वर्षांपूर्वी येथे विशाल मंदिर होतं. ज्याचे निर्माण पहिल्या शताब्दीच्या सरभपुरिया राजांद्वारे करण्यात आले होते. 12 व्या शतकात चित्रोत्पला महानदी पुरात हे मंदिर पूर्णपणे ध्वस्त झाले आणि उरलेला भाग जमिनीत दफन झाला. मागील अनेक वर्षांपासून पुरातत्त्व विभागाने येथून अनेक लहान-मोठे शिवलिंग बाहेर काढले, नंतर हा विशाल आकाराचा शिवलिंग बघून तर सर्व हैराण झाले.
शिवलिंगासोबतच काही शिक्के, ताम्रपत्र, भांडी, शिलालेख आणि मुरत्या सापडल्या आहेत. या सर्व वस्तू 2000 वर्ष जुन्या असल्याचे मानले जात आहे. हे स्थान राज्याची राजधानी रायपूरहून 78 किमी लांब आणि महासमुंदहून 35 किमी लांबीवर आहे.