Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अनिवासी भारतीयांचा सरत्या वर्षावर ठसा

अनिवासी भारतीयांचा सरत्या वर्षावर ठसा

वेबदुनिया

, शुक्रवार, 21 डिसेंबर 2007 (09:08 IST)
सरत्या वर्षात अनिवासी भारतीयांनी देखिल जागतिक पातळीवर ठसा उमटवला. राजकारण असो की व्यापार, चित्रपट असो की अवकाश कोणतेही क्षेत्र भारतीयांच्या प्रभावापासून मुक्त राहिले नाही. अशाच काही अनिवासी भारतीयांच्या कर्तृत्वाचा हा वेध....

NDND
सुनीता विल्यम्स
१९ सप्टेंबर १९६५ ला ओहियो येथे जन्म झालेली सुनीता विल्यम्स कल्पना चावलानंतर अंतराळात जाणारी दुसरी भारतीय महिला आहे. मिशन एसटीएस-११६ मध्ये बसून १४ सहकाऱ्यांच्या साथीने सुनीताने १० डिसेंबर २००६ ला अवकाशात उड्डाण केले. त्यानंतर सहा महिन्यांनी म्हणजे २२ जून २००७ ला ती पृथ्वीवर परतली. या काळात तिने तीनवेळा स्पेस वॉक केला. १९५ दिवस अंतराळात रहाताना सुनीताने सर्वांत जास्त काळ तेथे राहण्याचा विक्रमही केला.

बॉबी जिंदाल
अमेरिकेच्या लुझियाना प्रांताचे गव्हर्नर बनण्याचा मान यंदा भारतीय वंशाच्या बॉबी जिंदाल यांनी मिळविला. भारतीय वंशाचा व्यक्ती प्रथमच अमेरिकेत या पदावर जाऊन पोहोचला आहे. वीस ऑक्टोबर २००७ ला गव्हर्नरपदासाठी त्यांची निवड झाली. बॉबी १४ जानेवारी २००८ ला पदाची शपथ घेणार आहेत.

webdunia
NDND
लक्ष्मी मित्तल
राजस्थानातील चुरू येथे जन्म झालेल्या लक्ष्मी मित्तल जगातील गिन्याचुन्या शंभर प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोडतात. फोर्ब्स मासिकाने प्रसिद्ध केलेल्या जगातील श्रीमतांच्या यादीत या लक्ष्मीपुत्राने पाचवे स्थान पटकावले. जगातील सर्वांत मोठी स्टील कंपनी आर्सेलर खरेदी करून मित्तल यांनी आपल्या पोलादी साम्राज्याचा विस्तार केला. हे त्यांचे सर्वांत मोठे यश मानले जाते.

सी. के. प्रल्हा
webdunia
NDND
भारतीय वंशाचे मॅनेजमेंट गुरू सी. के. प्रल्हाद यांना जगातील सर्वांत प्रभावशाली मॅनेजमेंट थिंकर म्हणून निवडले गेले. या स्पर्धेत त्यांनी बिल गेट्स, एलेन ग्रीनस्पीन आणि रिचर्ड ब्रॅनसन यांच्यासारख्या प्रसिद्ध व्यवस्थापकांनाही मागे टाकले. पहिल्या पन्नासात स्थान मिळविणारे ते पहिले भारतीय आहेत. गेल्या वर्षी सनटॉपतर्फे जाहीर करण्यात आलेल्या यादीत त्यांचे नाव तिसऱ्या स्थानावर होते. कॉर्पोरेट धोरणांमध्ये प्रल्हाद यांना बापमाणूस मानण्यात येते.

विक्रम पंडित
webdunia
NDND
मराठमोळे विक्रम पंडित यांनी सरत्या वर्षाची छान भेट भारताला त्यातही मराठी मनाला दिली आहे. जगातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या सिटी ग्रुपचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बनले आहेत. सोळाव्या वर्षी अमेरिकेत शिकण्यासाठी गेलेल्या पंडीतांनी उच्च शिक्षण घेऊन तिथेच कारकिर्दीची श्रीगणेशा केला आणि मॉर्गन स्टॅन्लेसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम करत अखेर सिटी ग्रुपच्या सीईओपदापर्यंतचा टप्पा गाठला. शेगावच्या गजानन महाराजांवर नितांत श्रद्धा असणारे पंडीत आज एवढ्या मोठ्या पदावर असले तरी मनाने निखळ मराठी आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi