Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

निराशेतून आशेच्या हिंदोळ्यावर क्रिकेट

निराशेतून आशेच्या हिंदोळ्यावर क्रिकेट
NDND
वेस्ट इंडीजमधील विश्वकरंडक स्पर्धेतील अत्यंत खराब कामगिरी ते दक्षिण आफ्रिकेतील ट्वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धतील ऐतिहासिक विजय...अशा दोन टोकांमध्ये भारतीय क्रिकेट या वर्षी झुलले. आत्यंतिक निराशेनंतर आलेले आनंदपर्व भारतीयांनी इतक्या दणक्यात साजरे केले की या रसिकांनी विश्वकरंडकातील पराभवानंतर याच क्रिकेटपटूंची गाढवावरून प्रतीकात्मक धिंड काढली होती, हेही विसरायला झालं.

भारतीय क्रिकेटमध्ये यावर्षी अशा काही घटना घडल्या की त्याचा परिणाम भविष्यातील क्रिकेटवर नक्कीच होतील. भारतीय क्रिकेट मंडळ याही वर्षी आपल्या धक्कादायक कारभारामुळे चर्चेत राहिले. मंडळाने घेतलेल्या अनेक निर्णयाचा परिणाम आगामी काळात होतील. इंडियन क्रिकेट लीगमध्ये (आयसीएल) सामील होणार्‍या खेळांडूवर घातलेली बंदी व खेळांडूचे तोंड बंद ठेवण्यासाठी आणि निवड समितीच्या सदस्यांना वृत्तपत्रात स्तंभलेखनावर बंदी घालणारा आदेश खूप दिवस चर्चेत राहीला.

काही वेळा मंडळाला माघार घ्यावी लागली. त्यामध्ये प्रशिक्षकाच्या निवडीचा मुद्दा समाविष्ट आहे. ग्रेग चॅपेल यांच्या राजीनाम्यानंतर या पदासाठी निवडल्या गेलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅहम फोर्डने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची ऑफर लाथाडली होती. मग दक्षिण आफ्रीकेच्या गॅरी कर्स्टनची नियुक्ती करण्यात आली.

यापूर्वी जानेवारीत न्यूझीलंडमध्ये भारताला दक्षिण आफ्रिकेकडून तिसर्‍या व अंतिम कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर मात्र बांगलादेश व इंग्लंडला त्यांच्या मायदेशात 1-0 ने हरवून कसोटी मालिका जिंकली तर पाकिस्तानला 27 वर्षानंतर कसोटी मालिकेत‍ 1-0 ने हरविले.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये विश्वकरंडक स्पर्धा, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाकडून झालेले पराभव वगळले तर भारताची कामगिरी चांगलीच झाली आहे. यादरम्यान बांगलादेश, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका व पाकिस्तानकडून मालिका जिंकली. इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत 3-4 असा भारताचा काठावर पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने भारताचा 4-2 ने पराभव केला.

webdunia
NDND
वेस्ट इंडीजमध्ये भारतीय क्रिकेटवर लागलेला डाग धोनीसेनेने दक्षिण आफ्रिकेतील ट्वेंटी-20 विश्वकरंडक जिंकून पुसून टाकला. सचिन तेंडूलकर, राहूल द्रविड आणि सौरभ गांगुली हे दिग्गज खेळाडू या स्पर्धेत न खेळल्यामुळे भारतीय क्रिकेटचे भविष्य आता युवा खेळांडूच्या हातात सुरक्षित असल्याचे म्हटले जाऊ लागले.

webdunia
NDND
धोनीच्या संघाने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अंतिम सामन्यात पाकिस्तानसारख्या दिग्गज संघाला हरवून पहिला विश्वकरंडक पटकावला. 1983 नंतर प्रथमच भारताने विश्वकरंडक जिंकला. भारतीय संघ मायदेशात परतल्यावर मुंबईमध्ये त्यांचे शाही स्वागत झाले. त्याचे ध्वनी परदेशातही उमटले. भारतीय रसिकांचे क्रिकेटप्रेम किती आहे हेच यातून दिसून आले.

webdunia
NDND
भारतीय क्रिकेटने यावर्षी तीन कर्णधार पाहिले. राहूल द्रविडने इंग्लंड दौर्‍यानंतर अचानक कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्याचा हा निर्णय अजूनही एक रहस्य आहे. महेंद्रसिंग धोनी अगोदरच ट्वेंटी-20 स्पर्धेचा कर्णधार बनला होता. नंतर एकदिवसीय सामन्याची धुराही त्याच्यात हाती देण्यात आली. भारत‍ीय क्रिकेटचे नेतृत्व आता युवा खेळांडूच्या हाती गेले. पण कसोटी सामन्यासाठी अनुभवी अनिल कुंबळेकडेच कर्णधारपद देण्यात आले.

webdunia
NDND
आकड्यांमध्ये संघाच्या कामगिरीविषयी बोलायचे झाल्यास यावर्षी आतापर्यंत खेळल्या गेलेल्या नऊ कसोटी सामान्यात तीन सामने भारताने जिंकले व एका कसोटीत पराभव झाला. भारतीय संघाने 37 एकदिवसीय सामने खेळून 20 जिंकले. संघाला 15 सामन्यात हार पत्करावी लागली.

संघाने सुरवातीला वेस्ट इंडीज व श्रीलंकेविरूद्ध मायदेशातील एकदिवसीय मालिका जिंकून विश्वकप स्पर्धेची चांगली तयारी असल्याची झलक दाखविली होती. भारताला विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात होते, परंतु 17 मार्च 2007 या दिवशी भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप झाला.

विश्वकरंडक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात बांगलादेशाकडून भारत पराभूत झाला होता. बांगलादेशाने बर्मुडाच्या नवीन संघाला 257 धावांनी हरवून इतिहास रचला होता. श्रीलंकेने तिसर्‍या सामन्यात बांगलादेशला 69 धावांनी शिकस्त देत त्यांचे आव्हान संपवले.

webdunia
PTIPTI
दक्षिण आफ्रिकेत झालेल्या ट्वेंटी ट्वेंटी विश्वकरंडक स्पर्धेत युवराजसिंहने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार मारले. कसोटीसाठी त्याला बाद ठरविल्यानंतर दैवयोगाने मिळालेल्या संधीचाही त्याने फायदा घेत पाकिस्तानच्याविरूद्ध बंगळूर कसोटीत शतक झळकावून निवड समितीला दखल घ्यायला लावली.

जगातील सर्वात श्रीमं‍त क्रिकेट मंडळाने याचदरम्यान आपली 'मनीपॉवर' दाखवली. आयसीएल वाजत गाजत स्थापन झाल्यानंतर मंडळाने इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) सुरू केली. विदेशी खेळांडूसाठी या माध्यमातून कोट्यवधी रूपये दिले जाणार आहेत. आता मार्च एप्रिल 2008 मध्ये कळेल की मंडळाने खेळलेला हा जुगाराचा कितपत यशस्वी ठरतो.

जाता-जाता पुढील वर्षाच्या बाबतीत.... भारतासाठी सर्वांत मोठे आव्हान ऑस्ट्रेलिया दौर्‍यात असून तेथे चार कसोटी सामन्याशिवाय तिरंगी मालिका खेळायची आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रीकेचा संघ भारत दौर्‍यावर येणार आहे.

शेवटी यावर्षी दिलीप सरदेसाईसारख्या दिग्गज क्रिकेटपटूने अखेरचा निरोप घेतला. त्यांनी 1971 मध्ये वेस्ट इंडीजमध्ये संघाच्या विजयासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi