Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शाहरूख निर्विवाद ‘किंग’, चाहत्यांना अक्षयचीही ‘भूल’

शाहरूख निर्विवाद ‘किंग’, चाहत्यांना अक्षयचीही ‘भूल’
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रमुख अभिनेते चित्रपटांसोबतच त्यांच्या तगड्या मानधनासाठीही चर्चेत राहीले. आमिर खानने 30 कोटींची ऑफर लाथाडून पैशांपेक्षा आपण चित्रपट, कथा व निर्मिती मुल्यास अधिक महत्व देतो, हे अधोरेखित केले. या पार्श्वभूमीवर चित्रपटसृष्टीवर राज्य करणार्‍या प्रमुख अभिनेत्यांचा आढावा-

IFMIFM
अक्षय कुमार (नमस्ते लंडन, हे बेबी, भूलभुलैया)
अक्षय कुमारचे यावर्षी प्रदर्शित झालेले तीनही चित्रपट हिट झाले. त्यातच ख्रिसमसच्या शुभमुहूर्तावर त्याचा 'वेलकम' प्रदर्शित होत आहे. अक्षयच्या मते आपण कोणत्याही खानापेक्षा काही कमी नाही. इतर अभिनेत्यांना टिकून राहणे कठिण झाले असताना अक्षय सलग यशस्वी चित्रपट देत आहे. त्याच्या चाहत्यांच्या संख्येत यावर्षी झपाट्याने वाढ झाली आहे.

शाहरुख खान (चक दे इंडिया, ओम शांती ओम)
webdunia
IFMIFM
चित्रपटसृष्टीतील किंग खान अर्थात शाहरूखने यंदाचे वर्ष गाजवले. तो निर्विवाद बादशाह राहिला. 'चक दे इंडिया' सारखा वेगळा चित्रपट स्वीकारून त्याने धोका स्वीकारला होता. पण चित्रपट सुपरहिट झाल्याने त्याने घेतलेली रिस्क यशात परिवर्तित झाली. शिवाय त्याच्यावर असणारा त्याच त्या भूमिकांचा आरोपही दूर झाला. 'ओम शांति ओ' चित्रपटातून त्याने अंगातला शर्ट फेकून देत देओल आणि सलमान खानसारख्या अभिनेत्यांनाही आव्हान अंगप्रदर्शनात हम भी कुछ कम नही, हे दाखवून दिले. या दोन्ही चित्रपटांच्या यशस्वीतने शाहरूखचे नाणे अद्यापही खणखणीत असल्याचे सिद्ध झाले.

सलमान खान (सलाम-ए-इश्क, पार्टनर, मेरीगोल्ड, सांवरिया)
webdunia
IFMIFM
सलमानचे चारपैकी तीन चित्रपट आपटले. 'सलाम-ए-इश्क' व 'मेरीगोल्ड' हे चित्रपट का स्वीकारले, हे कोडे अद्यापही उलगडलेले नाही. 'सांवरिया' त्याला दोष देता येणार नाही. 'पार्टनर' हा त्याचा एकमात्र हिट चित्रपट राहिला. यामधून तो फक्त सुंदरच दिसला नाही तर गोविंदासोबत त्याची जुगलबंदी चांगलीच रंगली. लग्नाच्या बाबतीच मात्र त्याने अद्यापही निर्णय घेतलेला नाही.

अभिषेक बच्चन (गुरु, शूटआउट एट लोखंडवाला, झूम बराबर झूम, लागा चुनरी में दाग)
यावर्षात अभिषेक बच्चन चित्रपटांपेक्षा ऐश्वर्याशी लग्नामुळे अधिक चर्चेत राहीला. मणिरत्नम यांच्या 'गुरू' चित्रपटाने त्याला खणखणीत यश मिळवून दिले. 'झूम बराबर झूम' चित्रपटात बिग-बी असूनही तो दणकून आपटला. 'शूटआऊट...' व 'लागा चुनरी मे दाग' अभिषेक छोट्या भूमिकातून झळकला. मात्र काही चित्रपट यशस्वी होवूनही तो अद्यापपर्यंत स्थान घट्ट करू शकलेला नाही.

सैफ अली खान (ता रा रम पम, एकलव्य)
सैफचे लक्ष चित्रपटांपेक्षा गर्लफ्रेंड्सवर अधिक राहिले. यावर्षात त्याच्या चित्रपटांच्या संख्येपेक्षा जास्त मुलींशी नावे (रोजा, बिपाशा व करीना) जोडले गेले. खान त्रयींच्या स्पर्धेत उतरलेल्या सैफसाठी हे वर्ष एवढे अनुकूल राहिले नाही.


अमिताभ बच्चन (नि:शब्द, एकलव्य, शूटआउट एट लोखंडवाला, चीनी कम, झूम बराबर झूम, रामगोपाल वर्मा की आग)
'नि:शब्द' व 'रामगोपाल वर्मा की आग' हे चित्रपट केल्यामुळे अमिताभच्या वाट्याला प्रशंसेपेक्षा टीकाच आली. 'चीनी कम' ला शहरी भागात यश मिळाले. अभिषेकसाठी काही चित्रपट करण्याचा फटकाही त्याला बसला. आगामी वर्ष त्याला लाभेल अशी आशा करूया.

जॉन अब्राहम (सलाम-ए-इश्क, नो स्मोकिंग, गोल)
जॉन अब्राहमला कारकीर्दीविषयी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. त्याचे चाहतेही त्याच्या चित्रपटांना जात नाहीत. 'गोल' चित्रपट दणकून आपटल्यावरून ते सिद्धही झाले. त्याला अभिनयात सुधारणा करणे आवश्यक आहे.

संजय दत्त (एकलव्य, शूटआउट एट लोखंडवाला, धमाल, दस कहानिया, नहले पे देहला)
वर्षभरात संजय दत्तचा एक पाय तुरूंगात तर दुसरा स्टुडिओत राहिला. त्याने केलेल्या पाच चित्रपटांपैकी फक्त 'धमाल' ने तिकीट खिडकीवर धमाल केली. संजयचे स्थान घसरत आहे. तुरूंगातून सतत आत-बाहेर राहिल्याने मोठे निर्माते त्याच्यापासून पळ काढत आहेत.

सनी देओल (काफिला, अपने, फूल एन फाइनल, बिग ब्रदर)
सनीच्या यशस्वीतेचा सूर्य वर्षभर ढगांआडच राहीला. 'अपने' व्यतिरिक्त त्याचे इतर चित्रपट दणकून आपटले. चाहत्यांचे त्याच्यावर आजही प्रेम असले तरी रद्दी चित्रपट ते कसे बघणार. त्यामुळेच त्याने आपल्या निर्मिती संस्थेअंतर्गत चित्रपट निर्मितीचा धडाका लावला आहे.

शाहिद कपूर (फूल अँड फाइनल, जब वुई मेट)
चित्रपटसृष्टीत परिपक्व भूमिकांसाठी अपरिपक्व समजल्या जाणार्‍या शाहिदने गाडी 'जब वुई मेट' नंतर सुसाट सुटली आहे. त्याला आता एकट्यास अभिनेता म्हणून चित्रपट मिळू लागले आहेत. 'जब वुई मेट' व करीनामुळे शाहिदला हे वर्ष विसरणे नक्कीच शक्य नाही.

अजय देवगण (कॅश, रामगोपाल वर्मा की आग)
सशक्त अभिनेता असूनही अजयने दर्जाहीन चित्रपटातून झळकण्याचा झपाटा लावला आहे. त्याने आपणांस काही निवडक बॅनरपच्या मर्यादेत बांधून घेतल्याचे ‍िदसते. 'कॅश' व ' आग' हे दोन्ही चित्रपट दणकून आदळले.

बॉबी देओल (शाकालाका बूम बूम, झूम बराबर झूम, अपने, नकाब, नन्हें जैसलमेर)
अब्बास-मस्तान व यशराज फिल्मसने हात दिल्यानंतरही बॉबी तिकीट खिडकीवर नशीब काढू शकलेला नाही. 'अपने' चित्रपटातून वडील व भावासोबत अभिनय करण्याचा फायदा त्याला झाला, मात्र स्वत:च्या भरवशावर हिट चित्रपट देणे त्याच्यासाठी अशक्य झाले आहे.

अक्षय खन्ना (सलाम-ए-इश्क, नकाब, गांधी माय फादर, आजा नच ले)
सारख्या प्रयत्नानंतरही अक्षय अपयशाच्या कोंडाळ्यातून बाहेर पडू शकला नाही. 'गांधी माय फादर' मधील अभिनयासाठी त्याचे कौतुक झाले. पण एकट्याच्या भरवशावर हिट चित्रपट देणे शक्य नाही हे अधोरेखितही झाले.

रितेश देशमुख (हे बेबी, कॅश, धमाल)
विनोदी चित्रपटातून रितेशची भट्टी चांगलीच जमते. यावर्षात त्याच्या खात्यात दोन हिट चित्रपट जमा झाले आहेत. रितेश इमेज बदलण्याच्या प्रयत्नात आहे, मात्र निर्माता , दिग्दर्शक व प्रेक्षक त्याच्या विनोदी अभिनयाचेच चाहते आहेत.

ह्रतिक रोशन -
यावर्षात त्याचा कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. तर आमिर खानचा 'तारे जमीन पर' एवढ्यात प्रदर्शित होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi