Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवीन वर्षात महागाई आटोक्यात

- चंद्रकांत शिंदे

नवीन वर्षात महागाई आटोक्यात
जगातिक पातळीवर आर्थिक मंदी आणि महागाई यांची चर्चा सुरू आहे. आता नवीन वर्षात कशी परिस्थिती राहील याबाबत नागरिकांमध्ये चिंता आहे. व्याजदर काय राहतील? शेअर बाजाराची परिस्थिती कशी राहील? विमा क्षेत्रावर काय परिणाम झालेला असेल? यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न विविध क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत करण्यात आला.

सन 2008 च्या सुरवातीला अर्थव्यवस्था तेजीत होती. गुंतवणूकदारांना मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु सप्टेंबरनंतर जागतिक मंदीचे सावट अर्थव्यवस्थेवर पडू लागले. यामुळे आता सन 2009 कसा असेल असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

ND
महागाई: पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कपात केल्यानंतर चलनवाढीचा दर घसरण्यास प्रारंभ झाला. चलनवाढ सात टक्यापर्यंत खाली आल्याने नवीन वर्षात महागाई अधिकच कमी होईल, अशी अपेक्षा आहे. चलनवाढीचा दर अजून घसरणार असल्याने महागाई कमी होणार आहे. त्याचा फायदा जनतेला आणि भारतीय कंपन्यांनाही होणार आहे. कारण भारतीय कंपन्यांचा व्यवसाय देशातील जनतेवर अवलंबून आहे.

webdunia
WD
व्याजदर: अर्थशास्त्रातील तज्ज्ञ डि. के. जोशी यांच्या अंदाजानुसार सन 2009 मध्ये चलनवाढीचा दर मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. त्याचप्रमाणे व्याजदरही कमी होतील. रिझर्व्ह बँकेने नुकताच रेपो दर आणि व्याजदरात बदल केला आहे. यामुळेच नवीन वर्षाच्या पहिल्या तिमाहीत व्याजदर आणखी दोन टक्यांनी कमी होतील. पर्यायाने गृहकर्ज, व्यक्तीगत कर्ज, शैक्षणिक कर्ज, कार लोन यांचे व्याजदर कमी होतील. देशाची अर्थव्यवस्था सन 2009 च्या शेवटी किंवा सन 2010 च्या पहिल्या तिमाहीत पुन्हा गती घेईल.

webdunia
ND
रुपया मजबूत होईल: डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत होईल. शॉर्ट टर्म डिपॉझिटमध्ये वाढ होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi