Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारताची झेप आणि चांद्रयान

भारताची झेप आणि चांद्रयान
PTIPTI
अंतराळ संशोधन क्षेत्रातील सारे विश्वविक्रम मोडीत काढत 22 ऑक्टोबर 2008 रोजी बुधवारी पहाटे सहा वाजून 21 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन संशोधन केंद्रावरून भारताच्या पहिल्या 'चांद्रयान1' ने यशस्वी झेप घेतली. आता भारतही त्या सहा देशांच्या यादीत सहभागी झाला आहे ज्यांनी चंद्रावर पाऊल ठेवले आहे. आणि या मोहिमेनंतर चंदा मामाच्या अनेक रहस्यांचा उलघडाही आपण करू शकणार आहोत.ही या वर्षातील अत्यंत मोठी आणि तितकीच महत्वाची घटना आहे. आता आपली तयारी सुर्याच्या दिशेने सुरु झाली असून, येत्या वर्षभरातच इस्त्रोचा सुर्य प्रकल्प पुर्ण होण्याची शक्यता आता नाकारता येत नाही.

पीएसएलव्ही-सी 11 या रॉकेटच्या माध्यमातून हे यान झेपावले. 50 हत्तींचे वजन एकत्र केल्यानंतर जेवढे वजन होईल तितकेच वजन या रॉकेटचे असून, अंतराळात पोहचल्यानंतर हे यान सर्वात प्रथम पृथ्वीला प्रदक्षिणा घालणार आहे. यानंतर दोन वर्ष हे यान चंद्राचा अभ्यास करून चंद्राचे रहस्य उलघडण्याचा प्रयत्न करणार आहे.

साऱ्या बंधनांना तोडत हे यान भारतीय तिरंगा घेऊन शुन्यमंडळाला भेदते झाले आणि करोडो भारतीयांच्या डोळ्यात पाणी तरळले. भारताने प्रथमच संपूर्ण चांद्रमोहीम यशस्विरीत्या पूर्णं केली आहे.

या मोहिमेमुळे इस्रो आणि भारतीय वैज्ञानिकांचा दबदबा साऱ्या जगाला मान्य करावा लागणार आहे. या मोहिमेनंतर वैज्ञानिकांनी दिवाळी साजरी केली. तर भारतीय नागरिकांनीही एकमेकाना शुभेच्छा देत या मोहिमेचा यशस्वितेचा आनंद साजरा केला.या मोहिमेचा हा संक्षिप्त आढावा.
webdunia
WDWD


चांद्रयान 1 प्रकल्प

*२२ ऑक्टोबरला सकाळी ६.२० ला प्रक्षेपण
*स्थळ- श्रीहरिकोटा (चेन्नईपासून शंभर किलोमीटर दूर)
*व्हेईकल पीएसएसएलव्ही-सी११ याद्वारे प्रक्षेपण
* वजन- १३८० किलो

चांद्रयानाचे कार्य

*पहिल्यांदाच भारताचा एखादा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जाईल
*हे यान चंद्राच्या शंभर किलोमीटर वरून चारही बाजूंना प्रदक्षिणा घालेल. दोन वर्ष हे यान तेथेच राहिल.
*या यानातून एक उपकरण चंद्राच्या भूमीवर उतरेल. या उपकरणाच्या आधारे चंद्राचा अभ्यास केला जाईल.
*या यानाच्या माध्यमातून चंद्राचा नकाशा पहिल्यांदाच तयार करण्यात येईल.
*चंद्राचा एक जवळचा व लांबचा थ्री डी नकाशा बनविण्यात येईल.
*चांद्रयानात ११ विविध उपकरणे असतील. त्यातील ५ भारताची व ६ परदेशी असतील.
*चंद्राच्या भूमीवर ही उपकरणे सहा दिवसांत पोहोचतील.
*चंद्रावरील खनिजे व इतर पदार्थांबाबतची माहिती गोळा केली जाईल.
*अणू भट्टींसाठी आवश्यक हेलियम-३ या इंधनाचा शोध घेण्यात येईल.
*आंतराळ संशोधनासाठी चंद्रावर बेस कॅम्प बनविण्यासाठी शक्यता चाचपण्यात येईल.
*चंद्रावर पाणी आहे का याचा शोध घेण्यात येईल.
*चंद्राचा जन्म कसा झाला याचा शोध घेतला जाईल.

एकूण खर्च

*या मोहिमेसाठी ३६८ कोटी रूपये खर्च येईल.
*त्यातील शंभर कोटी रूपये यान प्रक्षेपणासाठी लागणार्‍या प्रक्षेपास्त्रासाठी (व्हेईकल) लागेल.
*शंभर कोटी रूपये डिप स्पेस नेटवर्कसाठी लागतील.
*उर्वरित १८६ कोटी स्पेसक्राफ्ट, सिस्टिम यासाठी लागतील.

आंतराळपटावर भारत

*याच वर्षी २८ एप्रिलला भारताने एकावेळी दहा उपग्रह सोडून भारताची या क्षेत्रातील वाटचाल इतर देशांना दाखवून दिली.
*गेल्या वर्षी भारताने इटलीचा उपग्रह अवकाशात सोडून १.१० कोटी डॉलर कमावले.
*भारताचे तब्बल ११ संपर्क उपग्रह अवकाशात आहेत. आशियात ही संख्या सर्वाधिक आहे.
*भारताची निर्मिती असलेले व संचालित केले जाणारे ७ रिमोट सेन्सिंग उपग्रहही अवकाशात आहेत.
*रिमोट सेंन्सिंग इमेजच्या एक तृतीअंश मार्केटवर भारताचे राज्य आहे.

भविष्यातील आंतराळ मोहिम
webdunia
WDWD


*चांद्रयान- चांद्रयानाच्या दुसर्‍या टप्प्यातील मोहिमेवरही काम सुरू झाले आहे. त्याला २०११ मध्ये पाठविण्यात येईल. या प्रकल्पासाठी रशियाचे सहकार्य आहे. यात स्पेसक्राफ्टशिवाय एक मून रोव्हरही असेल. ते चंद्रावर उतरून तेथील माती व दगडाचे नमुने घेईल. त्यानंतर त्याचे परिक्षण करून त्याची माहिती यानाकडे पाठवेल.

*मानवालाही पाठविणार चांद्रयान- यानंतर भारत मानवाला चंद्रावर पाठविणार आहे. २०१४ पर्यंत आंतराळवीराला अवकाशात पाठविण्याचा व २०२० पर्यंत चंद्रावर माणूस पाठविण्याचा इस्त्रोचा इरादा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi