Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबई आणि राज्यात २०१७ मध्ये जोरदार पाऊसाची हजेरी

मुंबई आणि राज्यात २०१७ मध्ये जोरदार पाऊसाची हजेरी
, शुक्रवार, 22 डिसेंबर 2017 (15:21 IST)
या २०१७ वर्षातील पावसाला हा मुंबई आणि राज्यातील अनेक भागांसाठी फार त्रासदायक ठरला आहे. यावर्षी पाऊस झाल्याने मात्र राज्यातील अनेक धरणे भरली आहेत. तर जवळपास १४ वर्षांनी मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण जायकवाडी हे पूर्ण क्षमतेने भरले आहे, जायकवाडी हे राज्यातील सर्वात मोठे धरण आहेत.
 
सप्टेंबर महिन्यात पावासने मुंबईला अक्षरक्षह झोडपून काढेल होते. मुंबईसह राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईतील अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून लोकस सेवा उशिराने सुरू आहे.तर दुसरीकडे येत्या २४ तासांत मुंबईसह, उत्तर आणि दक्षिण कोकणात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं वर्तवला आहे.
 
मुंबईतल्या पावसामुळं हिंदमाता, दादर, परेल, कुर्ला परिसरात पाणी भरलं होते. पाणी न ओसरल्याचं चित्र पाहायला मिळत होते. प्रचंड पावसामुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक  त्यामुळे अनेकदा विस्कळीत झाली होती.त्यामुळे नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले होते. २७ ऑगस्टपर्यंतचा गेल्या वर्षी १९३० मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यावर्षी २०१७ मध्ये  २३१९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
 
मुसळधार पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांवर पाणीच पाणी झालं होतं. अनेक लोक वाहनं रस्त्यावर सोडून चालत घरी निघाले होते. बॉम्बो हॉस्पिटलचे पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकरही दुपारी प्रभादेवीला आपल्या राहत्या घराच्या दिशेने निघाले होत आणि ते पाणी जाण्यासठी उघडलेल्या  ड्रेनेज मध्ये  घसरले आणि वाहून गेले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. मंगळवारी झालेल्या जोरदार वा-यासह आलेल्या पावसाने मुंबईला झोडपून काढले. बुधवारी सकाळी पावसाचा जोर जरा कमी झाल्याचे दिसत आहे. मात्र, दिवसभर झालेल्या पावसाने अनेकांना २६ जुलैची आठवण करून दिली.ऑगस्ट मध्ये दिवसभरात केवळ आठ तासात ४१६.६ मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या मान्सूनचा हा रेकॉर्डब्रेक पाऊस झाला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आदर्श घोटाळाप्रकरणी अशोक चव्हाणांना दिलासा