Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

करोना काळात गाजल्या या बेवसीरिज आणि त्यांचे कलाकार

करोना काळात गाजल्या या बेवसीरिज आणि त्यांचे कलाकार
, मंगळवार, 29 डिसेंबर 2020 (12:31 IST)
लॉकडाउनच्या काळात चित्रपटगृह बंद असल्यामुळे अनेक चित्रपट हे ओटीटीवर प्रदर्शित झाले. त्यासोबतच अनेक बेवसीरिज देखील कोरोना काळात चर्चेत ठरल्या. २०२० मध्ये 'मिर्झापूर', 'पाताललोक', 'गॅग्स ऑफ वासेपुर' या सारख्या वेब सीरिजला तुफान लोकप्रियता मिळाली. हा काळ काही कलाकारांसाठी जणू वेगळचं भाग्य घेऊन आला. अनेक कलाकार ओटीटीवर गेंमचेंजर ठरले.
 
'मिर्झापूर २'
पंकज त्रिपाठी- सर्वात आधी बोलू या पंकज त्रिपाठी यांच्याबद्दल. वेब विश्वात आता पंकज त्रिपाठी हे नाव चांगलंच ओळखीचं झालं आहे. मिर्झापूर, गॅग्स ऑफ वासेपुर तसेच चित्रपट लूडो द्वारे पंकज त्रिपाठी यांनी अभिनयाचा डंका चांगलाच वाजवला. ओटीटीवर त्यांनी प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं.
श्वेता त्रिपाठी - 'मिर्झापूर २' मध्ये गोलू ही भूमिका साकारणी अभिनेत्री श्वेता त्रिपाठी 'रात अकेली है' मध्येही दिसून आली.
दिव्येंदु शर्मा - मिर्झापूरमधील मुन्ना भैय्याची भूमिका अत्यंत गाजली. दिव्येंदु शर्माने ही भूमिका साकारली आणि त्यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले.
रसिका दुग्गल - 'मिर्झापूर २' मध्ये बीना त्रिपाठी ही भूमिका साकरणारी रसिका दुग्गल खूप चर्चेत राहिली. तिने 'लूटकेस', 'ए सुटेबल बॉय' यामध्येदेखील काम केलं आहे.
 
'पाताललोक'
जयदीप अहलावत- 'पाताललोक' या वेबसीरीजत हाथीराम चौधरीची भूमिका साकारणार्‍या जयदीप अहलावत यांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. 
अभिषेक बॅनर्जी - पाताललोक बघितल्यावर विलेनच्या प्रेमात पडणार्‍या प्रेक्षकांना 'हतोडा त्यागी' देखील आवडू लागला होता. 'पाताललोक'मधील ही भूमिका अभिषेक बॅनर्जीने साकारली होती. 
 
‘स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी’
प्रतिक गांधी - ‘स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी’ यात हर्षद मेहताची भूमिका साकरणारा प्रतिक गांधी देखील यांनी चांगला अभिनय करुन प्रेक्षकांचे मन जिंकले.
 
स्पेशल ऑप्स
स्पेशल ऑप्समधील के के मेननसह, सैयामी खेर, करण टैकर, दिव्या दत्ता, विनय पाठक, मुजम्मिल इब्राहिम, विपुल गुप्ता, सज्जाद डेलाफ्रोज, परमीत सेठी, गौतमी कपूर, सना खान, शरद केलकर, के.पी. मुखर्जी आणि इतर सर्वांनी आपल्या दमदार अभिनयाने ही सीरीज गाजवली.
 
आर्या
अनेक वर्षांपासून स्क्रीनहून लांब असणार्‍या सुष्मिता सेनने आर्या वेबसीरीजने दमदार कमबॅक केले. आणि प्रेक्षकांची तिला भरभरुन प्रतिसाद दिला.
 
पंचायत
पंचायत या सीरीजमध्ये रघुवीर यादवने दमदार काम केले आणि कोरोना काळात लोकांना बोरिंग वेळ घालवण्यात मदत केली. यात नीना गुप्ता देखील होती.

‘असुर: वेलकम टू योर डार्क साइड‘
यात अरशद वारसीने स्वत:ला सिद्ध केलंय की तो गंभीर भूमिकाही प्रमाणिकपणे साकारु शकतो तर मराठमोळा कलाकार अमेय वाघ ‘असुर‘ या सीरीजमुळे चर्चेत आला. त्याच्या व्यक्तिरेखेत चांगलाच बदल बघायला मिळाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रिलायन्स जिओची नवीन Parallel Calls सेवा, लँडलाईन कॉल मोबाइलवर येईल