Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एका रात्रीत479 ड्रोन उडवून रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केला

Russia ukraine War
, मंगळवार, 10 जून 2025 (15:25 IST)
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरूच आहे. अलिकडच्या काळात रशियाने युक्रेनवर हल्ले तीव्र केले आहेत. दरम्यान, युक्रेनियन हवाई दलाने सोमवारी सांगितले की, युद्धादरम्यान रशियाने एका रात्रीत सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यात रशियाने बॉम्बहल्ल्यासाठी 479ड्रोनचा वापर केला आहे.
युक्रेनियन हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, ड्रोन व्यतिरिक्त, युक्रेनच्या वेगवेगळ्या भागात विविध प्रकारच्या 20 क्षेपणास्त्रांचाही डाग करण्यात आला आहे. 
युक्रेनियन हवाई दलाने म्हटले आहे की या हल्ल्यांमध्ये प्रामुख्याने युक्रेनच्या मध्य आणि पश्चिमेकडील प्रदेशांना लक्ष्य करण्यात आले. हवाई दलाच्या निवेदनात म्हटले आहे की युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हवेत 277 ड्रोन आणि 19 क्षेपणास्त्रे नष्ट केली.
ALSO READ: युक्रेनने 72 तासांच्या आत रशियावर आणखी एक मोठा हल्ला केला,स्फोटकांनी क्रिमिया पूल उडवला
तीन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाने युक्रेनच्या नागरी भागांवर शाहिद ड्रोनने वारंवार हल्ले केले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या मते, या हल्ल्यांमध्ये 12,000 हून अधिक युक्रेनियन नागरिक मारले गेले आहेत. 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत मराठी भाषेवरून वाद