युक्रेनच्या ओडेसा शहराजवळील काळ्या समुद्रात गुरुवारी एक मालवाहू जहाज बुडाले. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर जहाजातील चालक दलातील चार सदस्य बेपत्ता आहेत. यातील दोन क्रू मेंबर्स लाईफ बोटीवर होते. आतापर्यंत या चौघांचा शोध लागलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, एस्टोनियन मालवाहू जहाज बुडण्याचे कारण भूसुरुंगाचा स्फोट असल्याचे सांगितले जात आहे. जहाजाच्या व्यवस्थापकाने सांगितले की एस्टोनियन मालकीचे मालवाहू जहाज हेल्ट गुरुवारी युक्रेनियन ओडेसा बंदरात स्फोट झाल्यानंतर बुडाले.
व्हिस्टा शिपिंग एजन्सीचे व्यवस्थापकीय संचालक इगोर इल्व्हस यांनी रॉयटर्सला सांगितले की क्रूपैकी दोन समुद्रात लाईफबोटीवर होते, तर इतर चार जणांचा शोध लागला नाही. यासंदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही.