मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने केलेल्या एकदिवसीय क्रिकेटमधील द्विशतकाचा विक्रमानंतर लिटील मास्टर सुनील गावसकर आणि ऑस्ट्रेलियाचा विक्रमवीर फिरकीपटू शेन वॉर्न यांनी सचिला सलाम केला आहे. गावसकरने तर सचिनचे चरणस्पर्श करणार असल्याचे म्हटले आहे.
सचिनच्या विक्रमाबाबत बोलताना गावसकर म्हणाला,' सचिन जगातील सर्वकालिन महान खेळाडू असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. वयाच्या 36 व्या वर्षी 442 व्या सामन्यात द्विशतक करुन आपण थकलेलो नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. त्यांच्या धावांची भूख सतत वाढत आहे. दिवसंदिवस त्यांची खेळी अधिकच प्रग्लभ होत आहे.
ऑस्ट्रेलियाचा विक्रमवीर शेन वॉर्न यानेही शाब्बास सचिन, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती, या शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे. तू महान असल्याचे सांगणे गरजेचे नाही कारण तू ते आपल्या कृतीतून सिद्ध करुन देतो.