मुंबईवर कोणा एकाची मक्तेदारी नाही. भारतातील सर्व लोकांचा मुंबईवर सारखाच अधिकार आहे. मी ही प्रथम भारतीय असून महाराष्ट्रात व मराठी असल्याचे आपणास अभिमान आहे, असे रोखठोक भूमिका मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने घेतली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पणाची 20 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल सचिनची खास मुलाखत घेण्यात आली होती. त्यावेळी चर्चेत असलेल्या मराठीच्या मुद्याबाबत त्याला विचारण्यात आले. तो म्हणाला, 'मुंबईवर प्रत्येक भारतीयाचा तेवढाच हक्क आहे, जेवढा मराठी माणसाचा आहे. मला महाराष्ट्रीय व मराठी असल्याचा सार्थ अभिमान आहे, परंतु सर्वप्रथम मी एक भारतीय नागरिक आहे.'
15 नोव्हेंबर 1989 रोजी मला भारतीय संघाची कॅप मिळाली. तो क्षण माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात महत्वाचा क्षण असल्याचे सचिनने सांगितले.