Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लतादीदींची सचिनबरोबर गाण्याची इच्छा

लतादीदींची सचिनबरोबर गाण्याची इच्छा

भाषा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबरोबर गाण्याची इच्छा आशा भोसले याने यापूर्वीच व्यक्त केली आहे. आता स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही सचिनबरोबर गाण्याची इच्छा व्यक्त केली. सचिनने आपल्याबरोबर गाणे म्हटल्यास मला खूप आनंद होईल, असे लतादीदींनी म्हटले आहे.

कोणी सचिनबरोबर गाण्याचे मला सांगितले तर मी त्यासाठी नक्कीच तयार असेल. योग्य वेळी आणि योग्य व्यासपीठावर आपण सचिनबरोबर गाण्यास तयार आहे. यापूर्वी आशा भोसले यांनी सचिनला त्यांच्यासोबत गाण्याचे आमंत्रण दिले होते. त्या म्हणाल्या होत्या की, सचिन क्रिकेटमध्येच इतका व्यस्त आहे की त्याला इतर बाबींकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नाही. मी एकेदिवशी त्याला माझ्या घरी जेवणाचे आमंत्रण देऊन त्याच्याशी चर्चा करेल. त्याच्यासोबत गाण्यास खूप मजा येईल.

लतादीदी म्हणाल्या,' सचिनला संगीताचा चांगले ज्ञान आहे. तो वेगवेगळ्या पद्धतीचे संगीत ऐकत राहतो. जेव्हा तो क्रिकेट खेळत नाही तेव्हा त्याच्या कानात वॉकमन किंवा एअरफोन असतो. तो ‍संगीताचा चांगला रसिक आहे.'

Share this Story:

Follow Webdunia marathi