Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सचिनचे पुस्तक फक्त 75 लाखांत

सचिनचे पुस्तक फक्त 75 लाखांत

भाषा

विक्रमांचे एव्हरेस्ट सर करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. परंतु हा विक्रम क्रिकेटमधील नाही. त्याचे 'तेंडुलकर ओपस्' हे पुस्तक विक्रीसाठी येणार असून त्याची किंमत फक्त 75 लाख रुपये असणार आहे. हे पुस्तक घेणार्‍या पहिल्या दहा जणांना सचिनच्या हस्ताक्षरासोबत रक्ताचा थेंब चिकटलेला मिळणार आहे.

WD
WD
लंडनमधील क्रेकन ओपस् या प्रकाशन संस्थेने सचिनवरली 'तेंडुलकर ओपस्' हे पुस्तक प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे. 800 पानांच्या या पुस्तकाचे वजन 30 किलो असणार आहे. या पुस्तकासाठी 75 लाख रुपये मोजावे लागणार आहे. सचिनचा आतापर्यंतचा क्रिकेट प्रवास आणि त्याची दुर्मिळ छायाचि‍त्रे या पुस्कात असणार आहे. सचिनचे कुटुंब, मित्र आणि सहकार्‍यांनी त्याच्यासंदर्भात केलेले लिखानही या पुस्तकात असणार आहे. पुस्तकात सचिनच्या गुणसूत्रांची बहुरंगी रचनाही छापली जाणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi