सचिनच्या तेंडुलकरच्या महाशतकात ग्रहांचा योगदान!
, गुरूवार, 24 नोव्हेंबर 2011 (13:07 IST)
सचिन रमेश तेंडुलकर मुंबई टेस्टमध्ये त्याचा 100वा आंतरराष्ट्रीय शतक लावणार आहे की नाही, हा प्रश्न प्रत्येकाच्या तोंडावर आहे. ज्योतिषामध्ये भरवसा ठेवणारे असे म्हणत आहे की ग्रहांचा असा संयोग बनत आहे की सचिन 24 नोव्हेंबर रोजी आपला 'महाशतक' पूर्ण करून 9 महिन्यांपासून चालत असलेल्या लोकांच्या उमेदीवर खरा उतरले.ज्योतिषांप्रमाणे सचिन गुरुवारी येत असलेल्या 24 तारखेला आपला 100 वा शतक लावू शकतो कारण हा अंक सचिनसाठी फार 'लकी' ठरला आहे.न्यूज 24ने दिलेल्या वृत्तानुसार सचिनची जन्म तारीख 24 एप्रिल 1973 आहे. 24 अंक सचिनच्या जीवनात नेहमीच काही खास घेऊन आला आहे. 24 मे 1995ला सचिनचा विवाह विवाह डॉ. अंजली मेहतासोबत झाला होता, अंजलीची आई एनआरआय आणि वडील आनंद मेहता गुजराती व्यवसायी होते. सचिनच्या घरी मुलगी सारा नंतर मुलगा अर्जुनचा जन्म देखील 24 सप्टेंबर 1999ला झाला. येथूनच सचिनला वाटू लागले की 24 नंबर त्याच्यासाठी लकी आहे. 40
वर्षाच्या एकदिवसीय क्रिकेट इतिहासात जेव्हा सचिनने फेब्रुवारी 2010मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध ग्वाल्हेरच्या रूपसिंह स्टेडियममध्ये दुहेरी शतक लावून नवीन रेकॉर्ड कायम केला ती देखील 24 तारीखच होती. ग्रहांना बघितले तर असे वाटत आहे की सचिनच्या जीवनात 9चा संयोग बनत आहे. मागील 9 महिन्यांपासून त्याचे 100व्या शतकाची आतुरतेने वाट बघत आहे. सचिन तेंडुलकराने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पणाच्या 9 महिन्यानंतर 9 ऑगस्ट 1990च्या दिवशीच आपला पहिला टेस्ट शतक लावला होता. हेच नव्हे तर 9चा आकडापण सचिनच्या जीवनात तेवढाच शुभ राहिला आहे कारण 9 सप्टेंबर 1994 मध्ये त्याने पहिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय शतक ठोकला होता. म्हणूनच सचिनच्या जर्सीचा नंबरदेखील 99 असतो. याच प्रकारे सर्वाचीच इच्छा आहे की सचिनला मुंबईत आपल्या घरच्या मैदानावर शतकांचे शतक, महाशतक पूर्ण करेल आणि जर 24 नोव्हेंबर 2011च्या दिवशी सचिनने शतक लावले तर हे सिद्ध होऊन जाईल की अंकांच्या गणीतात खरचच दम आहे.