Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

...तर सचिनचे 63 शतके राहिले असते

...तर सचिनचे 63 शतके राहिले असते
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा श्रीलंकेविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात 96 धावांवर नाबाद राहिला. 90 आणि 99 च्या दरम्यान सचिन अठरावेळा पोहचला आहे. परंतु त्याचे शतक पूर्ण होऊ शकले नाही. त्याने जर हे शतक पूर्ण केले असते तर त्याचे 63 शतक झाले असते.

सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 45 शतक पूर्ण केले आहेत. आतापर्यंत खेळलेल्या 439 सामन्यात 40 वेळा तो नाबाद राहिला आहे. त्याने 44.80 च्या सरासरीने 17386 धावा केल्या आहेत. त्यात 45 शतकांस 93 अर्धशतक आहेत. सचिन 99, 99, 98, 97, 97, 96 (नाबाद), 95, 95, 94, 93, 93, 93, 93, 93, 93, 91, 91 आणि 90 धावा केल्या आहेत. तसेच दोन वेळा 89 धावांवर तो बाद झाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi