मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रविवार (ता.15) रोजी 20 वर्ष पूर्ण झाले. क्रिकेटमधील 20 वर्षानंतरही सचिनची धावांची भूक कमी झालेली नाही. एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावा त्याच्याच नावावर आहे.
15 नोव्हेंबर 1989 रोजी गुजरानवाला येथे भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सामन्यात सचिनने भारतीय संघात प्रवेश केला होतो. त्यानंतर गेली 20 वर्ष भारतीय संघाचा तो महत्वाचा भाग राहिला आहे. सचिनने आतापर्यत 159 कसोटी आणि 436 एकदिवसीय सामन्यात भारताकडून सहभाग घेतला आहे.