भारतीय क्रिकेट संघातील कोहिनूर म्हणून ओळखला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सामजिक कार्यातही नेहमी अग्रसेर असतो. कॅन्सरग्रस्त मुलांच्या मदतीचे आवाहन त्याने ट्विटरवरुन केल्यावर मदतीसाठी लाखो हात पुढे आले. यामुळे 1 कोटी 25 लाख रुपये केवळ दोन आठवड्यात जमा झाले. मदत करणार्या काही जणांना सचिनबरोबर डिनरची संधी मिळाली.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कॅन्सरग्रस्त मुलांच्या मदतीसाठी 'सचिन्स क्रुसेड अगेन्स्ट कॅन्सर इन चिल्ड्रेन' ही मोहीम राबवली. त्यासाठी सचिनने ट्विटरवरून आपल्या फॅन्सना मदतीचे आवाहन केले होते. सचिनच्या हाकेला त्याच्या दानशूर फॅन्सनी भरभरून साथ दिली आणि सव्वा कोटी रुपये जमा झाले. त्यात एक लाखापेक्षा जास्त मदत करणार्यांना सचिनबरोबर गुरुवारी रात्री डिनरची संधी मिळाली. यावेळी सचिनने आपल्या जीवनातील काही 'राज'ही बाहेर काढले. त्याने आपल्या यशाचे सारे श्रेय परिवाराला दिले.
लोकांकडून भरभरुन मदत मिळाल्यामुळे सचिन भारवला. ट्विटरवर त्याने म्हटले, की लोकांनी माझ्या आवाहनानुसार मदत केल्याने मी खूप आनंदी झालो. मदत करणार्या सर्वांचे मी आभार मानतो.